शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘ओएफसी’चे खोदकाम वृक्षांच्या ‘मुळा’वर

By admin | Updated: July 3, 2017 15:24 IST

गर्द सावली देणाऱ्या या वृक्षांच्या मुळावर राज्य मार्गालगत विविध कंपन्यांच्या ‘ओएफसी’चे (आॅप्टीकल फायबर केबल) खोदकाम उठले आहे.

ज्ञानेश्वर मुंदे । यवतमाळ : इंग्रजांच्या काळापासून राज्य मार्गाच्या दोन्ही बाजूंनी डौलाने उभे असलेले वृक्ष गत काही दिवसात लहान-सहान वादळातही उन्मळून पडत आहे. गर्द सावली देणाऱ्या या वृक्षांच्या मुळावर राज्य मार्गालगत विविध कंपन्यांच्या ‘ओएफसी’चे (आॅप्टीकल फायबर केबल) खोदकाम उठले आहे. अगदी रस्त्याच्या हद्दीतच जेसीबीद्वारे खोदकाम होत असल्याने त्याची इजा वृक्षांच्या मुळांना पोहोचत आहे. गत काही दिवसात एकट्या यवतमाळ जिल्ह्यातच विविध राज्य मार्गावर शेकडो वृक्ष यामुळेच उन्मळून पडली असून अशीच स्थिती राज्यात सर्वत्र विविध मार्गांवर आहे. गत महिनाभरात जिल्ह्यात झालेल्या वादळात राज्य मार्गावरील अनेक वृक्ष उन्मळून पडली. काही वर्षापूर्वी वादळात झाडाच्या फांद्या तेवढ्या तुटून पडत होत्या. परंतु आता मोठे घेर असणारे वृक्षही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे साध्या वादळात उन्मळत आहे. मुळासह वृक्ष उन्मळून पडत आहे. शंभर वर्ष झालेली अनेक वृक्षे लहान-सहान वादळात जमीनदोस्त झाली आहे. पूर्वी यापेक्षाही मोठे वादळ यायचे. परंतु तेवढी हानी होत नव्हती. मात्र गत पाच वर्षात वृक्ष उन्मळण्याच्या घटनात मोठी वाढ झाली. या मागील मुख्य कारण म्हणजे रस्त्याच्या दोन्हीबाजूला विविध टेलिकॉम कंपन्यांचे ‘ओएफसी’ केबलसाठी केलेले खोदकाम होय. टेलिकॉम कंपन्या केबल टाकण्यासाठी दीड ते दोन मीटर खोलीच्या नाल्या खोदतात. यात झाडांना पोषक तत्व देणारी मुळं नष्ट होतात. हे खोदकाम दर सहा महिन्यानंतर सातत्याने कोणत्या कोणत्या टेलिकॉम कंपनीकडून केले जाते. विदर्भातील प्रत्येक राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला विविध कंपन्यांनी ‘ओएफसी’चे जाळे टाकले आहे. केबल टाकण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केले जाते. अनेक मार्गावर अगदी रस्त्यालगतच खोदकाम होत आहे. खोदकाम करताना वृक्षांच्या अगदी जवळूनच खोदकाम होते. त्यात मोठ्या प्रमाणात मुळ्या तुटतात. परंतु त्याचे कुणालाही देणे-घेणे नसते. एका बाजूला डांबरी सडक असल्याने त्या बाजूला मुळ्यांची वाढ होत नाही. तर दुसऱ्या बाजूला खोदकामामुळे भुसभुसीत जमीन झाली आहे. यवतमाळ-दारव्हा, अमरावती, आर्णी, नागपूर या सह विविध मार्गावर असे खोदकाम झाले आहे. त्यामुळे वृक्षांच्या मुळ्या उघड्या होऊन लहान वादळातही वृक्ष उन्मळून पडत आहे. सुदैवाने वृक्ष उन्मळून पडून मोठी घटना घडली नाही. परंतु भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.