शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
3
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
4
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
5
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
7
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
8
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
9
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
10
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
11
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
12
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
13
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
14
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
15
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
16
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
17
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
18
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
19
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
20
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती

ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्याला मारहाण

By admin | Updated: February 3, 2015 00:57 IST

खड्ड्यात पडलेल्या व्यक्तीला दुखापत झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी ओसीडब्ल्यूच्या कार्यालयावर दगडफेक केली. अधिकाऱ्याला मारहाण करून त्यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या.

नागपूर : खड्ड्यात पडलेल्या व्यक्तीला दुखापत झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी ओसीडब्ल्यूच्या कार्यालयावर दगडफेक केली. अधिकाऱ्याला मारहाण करून त्यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या. रविवारी दुपारी १ वाजता लालगंज परिसरात ही घटना घडली.लालगंजमधील पाण्याच्या टाकीजवळ एनएमसीच्या कर्मचाऱ्यांनी पाईप लाईन टाकण्यासाठी एक खड्डा खोदून ठेवला. या खड्ड्यात रविवारी दुपारी एक व्यक्ती पडून गंभीर जखमी झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा रोष उफाळून आला. संतप्त नागरिकांनी ओसीडब्ल्यूच्या कार्यालयावर दगडफेक केली. ही माहिती कळल्यामुळे राजेश वासुदेवराव ठक्कर (वय ४०, रा. गोपालकृष्ण नगर, वाठोडा) हे आपल्या सहकाऱ्यांसह कार्यालयात पोहचले. त्यांना पाहून संतप्त नागरिकांनी त्यांच्या वाहनावरही दगडफेक केली. ठक्कर यांना मारहाण केली आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करीत कार्यालयात तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. माहिती कळताच लकडगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मात्र, तत्पूर्वीच हल्ला करणारे पळून गेले. ठक्कर यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी गुन्हे दाखल केले. आरोपींचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)