शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ओसीडब्ल्यूला पाजले पाणी

By admin | Updated: May 21, 2014 01:10 IST

२४ बाय ७ पाणीपुरवठा असलेल्या धरमपेठ झोनअंतर्गत नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ओसीडब्ल्यूने (आॅरेंज सिटी वॉटर) नागरिकांकडून

काँग्रेस- राष्ट्रवादी आक्रमक : महापौरांचे चौकशीचे आदेश

नागपूर : २४ बाय ७ पाणीपुरवठा असलेल्या धरमपेठ झोनअंतर्गत नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ओसीडब्ल्यूने (आॅरेंज सिटी वॉटर) नागरिकांकडून मोठी रक्कम वसूल केली आहे, असा आरोप करीत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहात ओसीडब्ल्यूलाच पाणी पाजले. राष्ट्रवादीच्या गटनेत्या प्रगती पाटील यांनी उचललेला हा मुद्दा विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे, आभा पांडे आदींनी जोरात लावून धरला. प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेत महापौर अनिल सोले यांनी संबंधित प्रकरणाची आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे, सात दिवसात अहवाल सादर करण्याचे तसेच दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. महापौर सोले म्हणाले, करारानुसार जलवाहिनी असूनही पाणीपुरवठा होत नसलेल्या भागात पाणी देण्याची जबाबदारी ओसीडब्ल्यूची आहे. अशा भागात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पैसे घेतले जात असतील तर ते गंभीर आहे. यात दोषी असलेल्या अधिकार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. प्रगती पाटील म्हणाल्या, सिव्हिल लाईन्समधील उत्कर्ष अलंकार अपार्टमेंटमध्ये १४ कुटुंब राहतात. त्यांच्याकडे तीन नळ कनेक्शन आहेत. मात्र, पाणी मिळत नाही. येथील एका महिलेने ओसीडब्ल्यूकडून टँकर मागविले तर त्यांच्याकडून महिनाभराचे २३ हजार रुपये वसूल करण्यात आले. धरमपेठ झोनमध्ये २४ तास पाणीपुरवठा होत नसल्याचा दावा त्यांनी केला. आभा पांडे म्हणाल्या, मस्कासाथ प्रभागातील पाणी समस्येबाबत ३० एप्रिल रोजी नागरिकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली होती. आयुक्तांनी दोन दिवसांची वेळ मागितली होती. २१ दिवस गेल्यानंतरही समस्या सुटलेली नाही. ६० टक्के भागात कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठा होत आहे. महापौर सोले यांनी दहा दिवसात या भागातील पाणी समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)