शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सावकाराने घेतला वृद्धाचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:59 IST

सावकाराने केलेल्या मारपिटीमुळे जखमी झालेल्या ६५ वर्षीय तुळशीराम डबले यांचा मृत्यू झाला आहे.

खुनाचा गुन्हा दाखल : तीन दिवसात दुसरी घटना लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सावकाराने केलेल्या मारपिटीमुळे जखमी झालेल्या ६५ वर्षीय तुळशीराम डबले यांचा मृत्यू झाला आहे. डबलेच्या मृत्यूला अजनी पोलिसांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या तीन दिवसात घडलेली दुसरी घटना आहे. ६ जुलै रोजी श्रीरामनगर येथील रहिवासी धीरज गजभिये याने सहकाऱ्याच्या मदतीने तुळशीराम डबले व त्यांच्या पत्नीवर हल्ला केला होता. यात गंभीर जखमी झालेल्या डबले यांचा सोमवारी मृत्यू झाला. डबले हे वस्त्रोद्योग महामंडळातून सेवानिवृत्त झाले होते. अजनीतील विणकर वसाहतीमध्ये ते राहत होते. त्यांना धनंजय व राकेश ही दोन मुले आहेत. गजभिये हा सावकारीचे काम करतो. डबले यांचा मुलगा राकेश याने त्याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. पैसे परत करण्यासंदर्भात दोघांमध्ये वाद सुरू होता. राकेशच्या मते, बहुतांश रक्कम परत केली आहे. परंतु गजभिये इन्कार करीत आहे. ६ जुलैला रात्री ११ वाजता गजभिये राकेशच्या घरी आला. त्याने पैशाची मागणी केली. त्याचा डबलेंचा मुलगा धनंजय याच्याशी वाद झाला. दोघांमध्ये मारपीट झाली. दरम्यान, गजभिये हा राकेशच्या घरात शिरला. त्याने तुळशीराम डबले यांना शिवीगाळ करणे सुरू केले. त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यात डबले यांच्या डोक्याला जबर जखम झाली. त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, अजनी पोलिसांनी दोन्ही पक्षावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. सोमवारी रात्री उपचारादरम्यान डबले यांचा मृत्यू झाला. त्याआधारे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. डबले यांच्या कुटुंबीयांच्या मते, पोलिसांकडे यापूर्वीच गजभिये याची तक्रार केली होती. तो बऱ्याच दिवसापासून धमक्या देत होता. पोलिसांनी तक्रारीवर दुर्लक्ष केल्याने, शेवटी गजभिये याने घरात शिरून वडिलांचा खुन केला.