शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

समितीच्या कार्यकक्षेवर खडसेंचा आक्षेप

By admin | Updated: February 28, 2017 01:53 IST

झोटिंग समितीने शासनाच्या निश्चित केलेल्या कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन चौकशी केली.

नव्याने मुद्दे समावेश करण्यासाठी अर्ज : झोटिंग समितीपुढे आज पुन्हा सुनावणीनागपूर : झोटिंग समितीने शासनाच्या निश्चित केलेल्या कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन चौकशी केली. यावर आक्षेप नोंदवित चौकशीत नव्याने काही मुद्यांचा समावेश करण्याचा अर्ज माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या वतीने समितीला दिल्याची माहिती आहे. दरम्यान सोमवारी समितीकडून विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांचे खडसेंनी उत्तर दिले असून, उद्या मंगळवारला पुन्हा सुनावणी होणार आहे. महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर करून पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसीची जागा आपल्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती झोटिंग समिती गठित करण्यात आली. समिती गेल्या आठ महिन्यांपासून चौकशी करीत आहे. जागेशी संबंधित महसूल आणि एमआयडीसीकडून कागदपत्र समितीने तपासले. त्यांच्याकडून स्पष्टीकरणही मागविण्यात आले. एमआयडीसीकडून साक्ष, पुरावे सादर करण्यात आले. चौकशीसाठी खडसेंना समितीने हजर राहण्याचे आदेश दिले. यापूर्वी खडसेंनी जमिनीच्या व्यवहाराबाबत आपला संबंध नसल्याची साक्ष समितीसमक्ष दिल्याचे एमआयडीसीचे वकील चंद्रशेखर जलतारे यांनी सांगितले. खडसेंनी पूर्वीच्या पवित्र्यापासून घूमजाव केल्याचेही त्यांचे म्हणणे होते. दरम्यान सोमवारी पुन्हा समितीसमक्ष सुनावणी झाली. समितीकडून अनेक प्रश्न खडसेंना विचारण्यात आले. यातील काही प्रश्नांवर खडसेंकडून टाळाटाळीचे उत्तर दिल्याचे सूत्रांकडून समजते. समितीने चौकशी करताना शासनाकडून निश्चित करण्यात आलेल्या मुद्यांव्यतिरिक्तही अनेक मुद्यांवर तपास केला. यावर खडसेंनी आक्षेप घेत नव्याने काही मुद्यांचा समावेश करण्याचा अर्ज दिला. खडसेंच्या अर्जावर लेखी आक्षेप घेतल्याची माहिती एमआयडीसीचे वकील जलतारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. समितीला आणखीही काही प्रश्नांचा खुलासा करायचा आहे. त्यामुळे आता मंगळवारला पुन्हा सुनावणी होणार आहे. मंगळवारची सुनावणी अंतिम ठरवण्याची शक्यता आहे. त्यानंतर समिती अहवाल तयार करून शासनाला पाठविणार असल्याचे सूत्रांकडूून सांगण्यात येते.(प्रतिनिधी)