शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

संक्रांत बेतली शेकडो निष्पाप पक्ष्यांच्या जीवावर; शेकडो जीव नायलॉन मांजाच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2023 21:10 IST

Nagpur News नायलाॅन मांजा घेऊन केलेल्या पतंगबाजीच्या उन्मादामुळे यावर्षीची संक्रांतही माणसांप्रमाणे शेकडाे पक्ष्यांच्या जीवावर बेतली.

ठळक मुद्देउपचारापूर्वीच निष्पापांचा मांजाने घेतला जीव२० च्यावर पक्ष्यांवर उपचार सुरू

 

विशाल महाकाळकर

नागपूर : नायलाॅन मांजा घेऊन केलेल्या पतंगबाजीच्या उन्मादामुळे यावर्षीची संक्रांतही माणसांप्रमाणे शेकडाे पक्ष्यांच्या जीवावर बेतली. पक्षीप्रेमींनी केलेली सूचनांना धुडकावून नागरिकांनी केलेल्या पतंगबाजीत जखमी झालेल्या पक्ष्यांना पक्षीमित्रांनी रुग्णालयापर्यंत नेले. यातील २० पक्ष्यांवर सध्या उपचार सुरू आहेत, पण गंभीर अवस्थेत आणलेल्या पाच पक्ष्यांना उपचारापूर्वीच जीव गमवावा लागला.

संक्रांतीनिमित्त पतंगबाजीचा उत्सव गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. रविवारी संक्रातीच्या दिवशी आकाश पतंगांनी व्यापले हाेते. मात्र अनेकदा आवाहन करूनही आणि पाेलिसांचा बंदाेबस्त असूनही असंख्य बेजबाबदारांनी नायलाॅन मांजाचा माेह त्यागला नाहीच. त्यामुळे जे परिणाम व्हायचे, ते आता दिसून येत आहेत. झाडांवर, तारांवर अडकून असलेल्या या मांजात अडकून शेकडाे पक्षी जायबंदी झाले आहेत. नाेंदच न झालेल्या असंख्य पक्ष्यांचा जीव गेला असून शेकडाे तर जखमांनी विव्हळत असण्याची शक्यता आहे.

दरम्यान पक्षीप्रेमींनी नागरिकांना आवाहन करीत पक्ष्यांना वाचविण्याचे अभियान राबविले हाेते. त्यानुसार शहरातील अनेक पक्षीमित्रांनी जखमी पक्ष्यांची नायलाॅन मांजातून सुटका करीत वनविभागाच्या सेमिनरी हिल्सस्थित ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरला आणले. टीटीसीच्या डाॅक्टरांकडून अशा ३०च्या आसपास जखमी पक्ष्यांवर उपचार केले जात आहेत. यातील काही पक्षी बरेही झाले. मात्र अतिशय गंभीर अवस्थेत आणलेल्या ५ पक्ष्यांचा उपचार करण्यापूर्वीच जीव गेल्याची माहिती टीटीसीच्या डाॅक्टरांनी दिली. शहरात जिथे कुठे असे मांजात अडकलेले पक्षी दिसल्यास त्यांना टीटीसीपर्यंत आणण्याचे किंवा जखमी पक्ष्यांबाबत माहिती देण्याचे आवाहन कुंदन हाते यांनी केले आहे.

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती