शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बोरमधील वाघांची संख्या घटली

By admin | Updated: October 21, 2014 00:55 IST

वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्याला अलीकडेच टायगर रिझर्व म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी या अभयारण्यातील वाघांची संख्या मात्र गत सात वर्षांपासून सतत खाली घसरत असल्याची

धक्कादायक : वन्यजीव विभागाची पोलखोल नागपूर : वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्याला अलीकडेच टायगर रिझर्व म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी या अभयारण्यातील वाघांची संख्या मात्र गत सात वर्षांपासून सतत खाली घसरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. माहितीच्या अधिकारात स्वत: पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीतून हा खुलासा झाला आहे. यासंबंधी सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती प्राप्त केली आहे. वन विभागाच्या माहितीनुसार गत २००७ मध्ये बोर व न्यू बोर अभयारण्यात एकूण सहा वाघांचा अधिवास होता. यानंतर २००८ ते २०११ दरम्यान येथील वाघांची प्रगणना होऊ शकली नाही. त्यामुळे या काळातील आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. परंतु २०१२ मध्ये झालेल्या प्रगणेत येथील वाघांची संख्या सहावरून पाचपर्यंत खाली आली आहे. शिवाय २०१४ मध्ये ती पुन्हा खाली घसरून, आता केवळ चार वाघ येथे शिल्लक राहिले असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचवेळी वन्यजीव विभाग मात्र मागील दोन वर्षांत बोर व न्यू बोर अभयारण्यात फार मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्याचा ढिंडोरा पिटून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. जर या अभयारण्यात वन्यप्राण्यांचे संरक्षण व संवर्धनासंबंधी एवढी विकास कामे झाली, तर वाघांची संख्या कमी का होत आहे? असा वन्यजीवप्रेमी संघटनांतर्फे सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे नागपूरशेजारच्या उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील वाघाच्या संख्येत वाढ होऊन, सध्या येथे एकूण चार वाघांचा अधिवास असल्याचे वन्यजीव विभाग सांगत आहे. गत २००७ च्या प्रगणनेनुसार उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात एकही वाघ नव्हता. परंतु २०१३ मध्ये येथील वाघांची संख्या तीनवर पोहोचली आणि २०१४ मध्ये त्यात पुन्हा एका वाघाची भर पडून ती चार झाली आहे. तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पात एकूण २३ वाघ असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल आठ वाघांची भर पडली आहे. २०१३ मध्ये येथे एकूण १५ वाघ होते. परंतु आता ती संख्या २३ वर पोहोचली असल्याचे पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने सांगितले आहे. (प्रतिनिधी)