शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

विदर्भात रुग्णांची संख्या ७५ हजारावर; २, ३८७ नवे रुग्ण, ५९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 10:35 IST

विदर्भात कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. सोमवारी २,३८७ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या ७५,१४१ झाली आहे. तर ५९ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या २,०५८वर पोहचली आहे.

ठळक मुद्देमृतांची संख्या २,०५८६३.७१ टक्के रुग्ण बरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. सोमवारी २,३८७ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या ७५,१४१ झाली आहे. तर ५९ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या २,०५८वर पोहचली आहे. आतापर्यंत ४७,८७९ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णसंख्येच्या तुलनेत ६३.७१ टक्केरुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २०,४९७ रुग्ण उपचाराखाली आहेत.

नागपूर जिल्ह्यात १,५५० रुग्ण पॉझिटिव्ह तर ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सात दिवसांपासून हीच स्थिती आहे. रुग्णांची एकूण संख्या ४१,०३२ तर मृतांची संख्या १,३६५ झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या २८,६३८ वर गेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १५२ नव्या रुग्णांची नोंद झाली तर दोन रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्या ४,०५५ तर मृतांची संख्या ४८ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात १५० रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णसंख्या ३,९९५ झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात १३९ रुग्णांची नोंद झाली तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ४,३९२ झाली असून मृतांची संख्या १२४ वर गेली आहे. भंडारा जिल्ह्यात १०३ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या २,१०६ झाली आहे. जिल्ह्यात दोन रुग्णाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ३७ वर पोहचली आहे.अमरावती जिल्ह्यात ८२ रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या ७,०८७ झाली आहे. वाशिम जिल्ह्यात ८१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या २,२४४ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात रुग्णसंख्येत किंचीत घट आली. ५४ रुग्ण पॉझिटिव्ह आले, मात्र मृत्यूचे सत्र सुरूच आहे. दोन रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३३ झाली आहे.

वर्धा जिल्ह्यात ५७ रुग्ण व दोन रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या १,७७५ तर मृतांची संख्या ३४ वर गेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात १९ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णसंख्या १,३०१ झाली आहे. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस