शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील आॅक्सिजनचे प्रमाण घटले

By admin | Updated: October 5, 2015 02:50 IST

शहरातील तलावांच्या जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. विसर्जनानंतर तलावातील आॅक्सिजनची मात्रा दुप्पटीने कमी झाली आहे.

विसर्जनानंतर वाढले प्रदूषण : मासे मृत्युमुखी पडायला सुरुवात नागपूर : शहरातील तलावांच्या जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. विसर्जनानंतर तलावातील आॅक्सिजनची मात्रा दुप्पटीने कमी झाली आहे. नागपुरातील एका पर्यावरणवादी संस्थेने केलेल्या तलावाच्या तपासणीत ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे गांधीसागर तलावात मासे मृत्युमुखी पडायला सुरुवात झाली आहे. गणेश विसर्जनापूर्वी नागपूर महापालिका व पर्यावरणवादी संस्थांनी तलावाच्या संरक्षणासाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु भक्तांच्या श्रद्धेपोटी तलावांचे प्रदूषण रोखण्यात अपयश आले. मूर्ती विसर्जन व निर्माल्यामुळे मोठ्या प्रमाणात तलाव प्रदूषित झाले आहेत. नागपुरातील ग्रीन विजील या संस्थेने विसर्जनापूर्वी तलावाच्या प्रदूषणाची मोजणी केली होती. त्यानंतर रविवारी पुन्हा शहरातील तीन मुख्य तलावाच्या पाण्याची तपासणी केली. या तपासणीत त्यांनी तलावातील पाण्याचे तापमान, पाण्याचा ‘पीएच’ ज्यात पाण्यात आम्लता व क्षारचे प्रमाण, पाण्यातील गढुळपणा ‘टर्बिडीटी’ आणि पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण याची तपासणी केली. संस्थेच्या चमूने सोनेगाव, गांधीसागर व फुटाळा तलावाच्या पाण्याचे नुमने घेतले. या नमुन्याच्या तपासणीअंती अतिशय धोकादायक निष्कर्ष पुढे आले. या तपासणीत संस्थेच्या सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, कुमारेश टिकाधर, आकाश शेंडे, नेहा चावला, भाग्यश्री वाकडे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)तलावातील जैवविविधतेला धोकातपासणीअंती अतिशय धक्कादायक चित्र समोर आले आहे. पाण्यातील आॅक्सिजनची मात्रा कमी झाल्याने तलावातील जैवविविधतेला धोका आहे. सोनेगाव तलावात यंदा विसर्जनास बंदी असल्याने या तलावावर फारसा परिणाम झाला नाही. मात्र फुटाळा व गांधीसागर तलावात धोक्याची पातळी गाठली आहे. पिण्याच्या पाण्याचा पीएच ७ ते ७.२ असतो. मात्र तलावाच्या पाण्याचा पीएच ८ च्या वर गेला आहे. त्यामुळे क्षारचे प्रमाण वाढले आहे. तलावाच्या प्रदूषणाचा हा संपूर्ण डाटा वर्ल्ड वॉटर फेडरेशनकडे पाठविण्यात येणार आहे. -सुरभी जयस्वाल, प्रोजेक्ट को-आॅर्डिनेटरस्थानिक प्रशासनाने दखल घ्यावीतलावाच्या प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली असतानाही, स्थानिक प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. आमच्या संस्थेतर्फे दरवर्षी प्रदूषणाची स्थिती जाणून घेतल्या जाते. दरवर्षी त्याचा आढावाही घेतला जातो. परंतु प्रदूषण महामंडळासारखा विभाग हे गंभीरतेने घेत नाही. साधी तपासणीसुद्धा करीत नाही. मेहुल कोसुरकर, सदस्य