शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

१०८ नंबरला साडेसाती

By admin | Updated: June 27, 2017 01:40 IST

गंभीर रुग्णांना जागेवरच वैद्यकीय सेवा देऊन त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात पोहचविण्याची जबाबदारी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची आहे.

कशी मिळणार रुग्णांना तातडीची सेवा? तीन किलोमीटरचे अंतर कापायला रुग्णवाहिकेला लागतात २० मिनिटेरुग्णांना निवडावा लागतो दुसरा पर्यायसुमेध वाघमारे/ विशाल महाकाळकर। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गंभीर रुग्णांना जागेवरच वैद्यकीय सेवा देऊन त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात पोहचविण्याची जबाबदारी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची आहे. परंतु पहिल्या प्रयत्नात हा क्रमांकच लागत नाही. पलीकडून ‘पुन्हा प्रयत्न करा’ असे उत्तर मिळते. वारंवार ‘डायल’ करण्याची वेळ येते. शिवाय, तांत्रिक अडचणींमुळे रुग्णवाहिका रुग्णस्थळी वेळेत पोहचत नाही. तीन किलोमीटरचे अंतर कापायला २० मिनिटांवर कालावधी लागतो. अशा अनेक अडचणींना रुग्णाला सामोरे जावे लागत असल्याने अनेकांवर दुसरा पर्याय निवडण्याची वेळ येते.आठवेळा प्रयत्न केल्यानंतर लागला फोन‘लोकमत’चमूने त्रिमूर्ती नगर चौक येथून दुपारी २.४५ वाजता १०८ क्रमांकाला फोन लावण्याचे प्रयत्न केला. परंतु ‘बीप’चा आवाज येऊन फोन ‘कट’ होत होता. दुसऱ्या मोबाईलवरून हा प्रयत्न केला असता पुन्हा तोच अनुभव आला. तिसऱ्या-चौथ्या प्रयत्नानंतर ‘पुन्हा प्रयत्न करून पाहा’ असे उत्तर मिळाले. तब्बल आठवेळा प्रयत्न केल्यानंतर १०८ क्रमांकाशी जुळता आले.‘लोकमत’ चमूने सोमवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून १०८ क्रमांकावर डायल करून या रुग्णवाहिकेची मदत मागितली असता हे वास्तव सामोर आले.सार्वजनिक आरोग्य विभागाने २६ जानेवारी २०१४ पासून संपूर्ण राज्यात १०८ क्रमांक रुग्णवाहिकेची नि:शुल्क सेवा उपलब्ध करून दिली. सध्या नागपूर जिल्ह्यात ४२ , तर शहरात २२ रुग्णवाहिका आहेत. यातील सहा ‘अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट’ तर १६ ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिकांना शहरातील विविध ठिकाणे नेमून दिली आहेत. यात शासकीय रुग्णालयांसोबतच, महानगरपालिकेची रुग्णालये, महानगरपालिकेची झोन कार्यालये व काही पोलीस ठाणे आहेत. साधारण १०-१५ किलोमीटरचे क्षेत्र या रुग्णवाहिकांना देण्यात आले आहे. प्रत्येक रुग्णाला जागेवरच रुग्णसेवा मिळावी यासाठी रुग्णवाहिकेमध्ये एक डॉक्टर व त्यांच्यासोबतील जीवनरक्षक औषधे आणि उपकरण उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामुळे ही योजना काहींसाठी जीवनदायी ठरत असली तरी याचा फारसा उपयोग होताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे.‘एसी’ बंद राहिल्यास गुदमरल्यासारखे होतेनेहमी रुग्णाच्या मदतीला धावून जाणारे, सुनील जवादे यांनी सांगितले, अनेकवेळा या रुग्णवाहिकेचे वातानुकूलित यंत्र (एसी) बंद असते. व्हेंटिलेटरची सोय नसल्याने अशावेळी गुदमरल्यासारखे होते. मेडिकलमध्ये लागतो वेळ१०८ च्या एका डॉक्टरने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, गंभीर रुग्णांना शासकीय रुग्णालयात पोहचविल्यावर आम्हाला दुसऱ्या ‘कॉल’साठी तयार राहावे लागते. परंतु मेयो, मेडिकलमध्ये रुग्ण पोहचल्यावर तेथील अटेन्डंट मदत करीत नाही. आमच्याच स्ट्रेचरवर रुग्ण ठेवून बाह्यरुग्ण विभाग, अपघात विभाग आणि नंतर वॉर्डात फिरविले जाते. यात अर्ध्या तासाच्यावर वेळ जातो. अशावेळी दुसऱ्या रुग्णापर्यंत पोहचण्यास उशीर होतो.१६ मिनिटात पोहचली रुग्णवाहिकात्रिमूर्तीनगर चौकात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची मदत मागितली असता सुरुवातीला फोन ‘पुणे’ येथे गेला. तेथील ‘आॅपरेटरला’ नागपूरची माहिती नव्हती. यामुळे त्याला पत्ता समजावून घ्यायलाच तीन ते चार मिनिटांचा वेळ लागला. त्यांनी नागपूरच्या संबंधित रुग्णवाहिकेला तो नंबर जुळवून दिल्यानंतर पुन्हा पत्ता सांगावा लागला. यात आणखी तीन ते चार मिनिटे गेली. परंतु बोलणे संपताच १६व्या मिनिटांत रुग्णवाहिका त्रिमूर्तीनगर चौकात पोहचली.मेडिकल वंजारीनगर पोहोचायला लागली २० मि.‘लोकमत’ चमूने वंजारीनगर पाण्याच्या टाकीजवळून एका रुग्णाच्या मदतीसाठी १०८ वर फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु नंबर न लागण्याचा जुनाच अनुभव पुन्हा आला. ४.५९ वाजता फोन जुळल्यावर नागपूरच्या संबंधित डॉक्टरला फोनवर यायला तीन ते चार मिनिटांचा वेळ लागला. पत्ता विचारल्यावर पोहचायला २० मिनिटे लागली. यामुळे ज्या रुग्णासाठी ही रुग्णवाहिका बोलविली तो आॅटोरिक्षाने निघून गेला. रुग्णवाहिकेत लागतात दचके१०८ क्रमांकाचा अनुभव घेतलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना याविषयी विचारले असता, त्यांनी सांगितले, ‘बेसिक लाईफ सपोट’ची ‘डॉक्स प्लस’ नावाची वाहने रुग्णांसाठी नसल्यासारखीच आहे. रुग्णवाहिका असूनही फार दचके लागतात. छोटा खड्डा आला तरी वाहन उसळते. यामुळे एका जणाला रुग्णाला पकडून बसावे लागते.