शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणमंत्र्यांविरोधात ‘एनएसयूआय’ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:20 IST

विद्यार्थी संघाच्या निवडणुकांबाबत राज्य शासनाच्या उदासीन धोरणावरून विद्यार्थी संघटनांमध्ये नाराजीचा सूर आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी संघ आणि पदवीधर गटातील निवडणुका घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थी संघाच्या निवडणुकांबाबत राज्य शासनाच्या उदासीन धोरणावरून विद्यार्थी संघटनांमध्ये नाराजीचा सूर आहे. बुधवारी ‘एनएसयूआय’ने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासमोर आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. सोबतच प्राधिकरण निवडणुकांसोबतच पदवीधर गटातील निवडणुका घेण्याचीदेखील त्यांनी मागणी केली.राज्य शासनाकडून विद्यार्थी संघ निवडणुकांबाबत कुठलेही दिशानिर्देश देण्यात आले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने निवडणूक प्रक्रिया थंडबस्त्यात टाकली आहे. दुसरीकडे प्राधिकरण निवडणुकांची तयारी जोरात सुरू आहे. मात्र अद्यापदेखील प्रशासनाकडून वेळापत्रकाची अधिकृत घोषणा झालेली नाही. यावरून ‘एनएसयूआय’ने हे आंदोलन केले.प्रदेश उपाध्यक्ष अजित सिंह यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांची भेट घेतली. विधीसभा, विद्वत् परिषद व अभ्यास मंडळ या विद्यापीठ प्राधिकरणांच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार आहेत. मात्र पदवीधर गटाच्या निवडणुका जानेवारी महिन्यातच होऊ शकणार आहेत. या सर्व निवडणुका एकत्र घेण्यात याव्यात तसेच विद्यार्थी संघाच्यादेखील निवडणुका घ्याव्या, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. विद्यार्थी संघाच्या निवडणुकांबाबत राज्य शासनाकडून अद्याप काहीच निर्देश मिळालेले नाहीत. त्यामुळे निवडणुका घेणे शक्य नाही, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व मिळू नये हीच विद्यार्थी संघ आणि पदवीधर गटाच्या निवडणुका न घेण्यामागे भूमिका असल्याचा आरोप यावेळी ‘एनएसयूआय’तर्फे करण्यात आला. कुलगुरूंकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा पुतळा जाळला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते.