शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

आता उपराजधानीतही मोबाईल डान्सबार

By admin | Updated: August 12, 2016 02:33 IST

राज्यात डान्सबारचा विषय प्रलंबित असतानाच काही दलालांनी आता उपराजधानीत मागील काही महिन्यांपासून अवैधरीत्या मोबाईल डान्सबार सुरू केले आहेत.

पॉश फ्लॅटमध्ये रंगते मैफिल : एकाच रात्री लाखोंचे वारे-न्यारे नरेश डोंगरे नागपूर राज्यात डान्सबारचा विषय प्रलंबित असतानाच काही दलालांनी आता उपराजधानीत मागील काही महिन्यांपासून अवैधरीत्या मोबाईल डान्सबार सुरू केले आहेत. मुंबई, पुण्यासह बाहेरच्या राज्यातील बार डान्सर्स बोलावून पॉश फ्लॅटमध्ये मैफील भरवली जात आहे. याची व्हिडिओ क्लीप आंबटशौकिन, धनिकबाळामध्ये पसरविली जात आहे. त्यातून मनोरंजन करतानाच एका रात्रीत लाखोंचे वारे-न्यारे केले जात आहेत. डान्सबार परवान्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला परवानगीबाबत निर्देश दिल्यामुळे डान्सबार मालकांनी अनेक दिवसांपासून तयारी करून ठेवली आहे. कधी एकदाची सरकार परवानगी देते अन् कधी डान्सबारची छमछम तसेच नोटांची बरसात बघायला मिळते, अशी अनेक डान्सबार मालकांची अवस्था आहे. मात्र, नवनवीन अटीेंमुळे डान्सबारचा विषय प्रलंबित आहे. दुसरीकडे नोटांची बरसात करवून घेण्याची सवय जडलेल्या दलालांनी आता ‘मोबाईल डान्सबार‘ सुरू केले आहेत. पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून कधी या भागात तर कधी त्या भागात ते डान्सबारचे आयोजन करीत आहेत. (एकाच ठिकाणी नसल्यामुळेच त्याला मोबाईल डान्सबार म्हणतात !) काही दिवसांपूर्वी नंदनवन, वर्धमाननगरात अशी मैफल रंगली. दोन महिन्यांपूर्वीपर्यंत रिसोर्ट, फार्म हाऊस किंवा बंगल्यातही ‘तात्पुरता बार सुरू करून डान्स‘चे आयोजन केले जायचे. लोकमतने वेळोवेळी या गोरखधंद्याचा पर्दाफाश केल्यामुळे बारमालक आणि दलालांच्या पुढाकाराने चालणारे बहुतांश छुपे डान्सबार बंद झाले. त्याऐवजी आता बंगल्यात किंवा पॉश सदनिकेत आठवड्यातून एक-दोनदा डान्सबारचे आयोजन केले जाते. आयोजनाच्या चार-सहा तासांपूर्वी विशिष्ट ग्राहकांना फोन करून त्याची माहिती दिली जाते. बार डान्सर्सचे फोटोही पाठविले जाते. त्यानंतर डान्सबारचा आनंद लुटण्यासाठी आंबटशौकिन मंडळी एखाद्या विशिष्ट ठिकाणी गोळा होतात. मोठया वाहनात बसवून आयोजनाच्या ठिकाणी त्यांना नेले जाते. डान्सबारची किमान पाच हजार रुपये एन्ट्री फी असते. खाण्यापिण्याच्या व्यवस्थेसाठी वेगळी रक्कम घेतली जाते. वेश्याव्यवसायही होतो मध्यरात्री सुरू झालेली ही ‘डान्स नाईट‘ पहाटेपर्यंत सुरू असते. या वेळेत नोटांचा अक्षरश: पाऊस पडतो. अवघ्या काही तासात लाखोंचे वारे-न्यारे होतात. डान्सचे आयोजन संपल्यानंतर बार डान्सरकडून देहव्यवसायही होत असल्याची माहिती आहे. त्यासाठी डान्स बघणारी मंडळी चक्क लिलावाप्रमाणे बोली लावतात. जो जास्त रक्कम देईल त्याला ही ‘सुविधा’ उपलब्ध केली जाते. मुंबई, पुणे, चेन्नई, बेंगरुळू, हैदराबाद, पटियाला, चंदीगड, कोलकाता, लुधियाना, दिल्ली, रायपूर, इंदूर, लखनौ आणि अलीकडे नोएडासारख्या महानगरातील बहुचर्चित ‘बार डान्सर्स‘च्याही नागपूर खेपा वाढल्या आहेत.