शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘मेडिकल’प्रमाणे होणार ‘एमबीए’चा अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 12:00 IST

‘एमबीए’ अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांचा वाढता आकडा पाहून ‘एआयसीटीई’ने कठोर निर्णय घेतला आहे. यानुसार आता ‘एमबीए’चा अभ्यास हा ‘मेडिकल’ अभ्यासक्रमाप्रमाणे होणार आहे.

ठळक मुद्देउद्योजक झाल्याचा पुरावा दिल्यावरच पदवी मिळणार‘एआयसीटीई’चा निर्णय

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘एमबीए’ अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांचा वाढता आकडा पाहून ‘एआयसीटीई’ने कठोर निर्णय घेतला आहे. यानुसार आता ‘एमबीए’चा अभ्यास हा ‘मेडिकल’ अभ्यासक्रमाप्रमाणे होणार आहे. सद्यस्थितीत ‘एमबीए’मध्ये चार सत्र आहेत. हे सर्व सत्र उत्तीर्ण झाल्यावरच विद्यार्थ्यांना पदवी मिळते. मात्र नवीन नियमांनुसार चार सत्र पूर्ण झाल्यानंतर ‘एमबीए’च्या विद्यार्थ्यांना दोन ते तीन वर्षांत उद्योजकतेचे प्रशिक्षण घ्यावे लागेल व उद्योजक झाल्याचा पुरावा दिल्यानंतरच पदवी मिळू शकेल.‘लोकमत’शी विशेष संवादादरम्यान ‘एआयसीटीई’चे उपाध्यक्ष डॉ.एम.पी.पुनिया यांनी हा खुलासा केला आहे. उद्योजक झाल्याचा पुरावा देणे विद्यार्थ्यांना अनिवार्य असणार आहे. विद्यार्थ्यांना उद्योजकता प्रशिक्षण प्राप्त केल्यानंतर उद्योग स्थापित करण्यात आर्थिक अडचणी येऊ नयेत याची काळजी नवीन तरतुदींमध्ये करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्यासाठी महाविद्यालयांना आर्थिक मदत करावी लागेल. ‘एमबीए’ महाविद्यालयांना हे अनिवार्य करण्यात येईल. यासाठी महाविद्यालय व संस्थांसाठी बनविण्यात आलेले नियम व मापदंड यात बदल करण्यात येईल. या मापदंडांवर खरे न उतरणाऱ्या महाविद्यालयांना ‘एआयसीटीई’ मान्यताच देणार नाही. विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडावे यासाठी त्यानुसार अभ्यासक्रम तयार करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र