लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे टाकत नागपूर-गडचिरोली-नागपूर शिवशाही बसची सेवा १० एप्रिलपासून सुरु केली आहे. ही बस नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकावरून सकाळी ५.४५, ६.३०, दुपारी २.३०, ३ वाजता सुटेल. गडचिरोलीवरून ही बस सकाळी १०.१५, ११, सायंकाळी ६.३०, ७ वाजता राहील. या बसचा मार्ग नागपूर, उमरेड, नागभीड, ब्रह्मपुरी, आरमोरी, गडचिरोली असा राहणार आहे. सदर शिवशाही बस वातानुकुलित असून आकर्षक डिजिटल बोर्ड, पुशबॅक आरामदायक सिट, २ बाय २ आसन व्यवस्था मोबाईल चार्जरसह, सीसीटीव्ही कॅमेरा, उद्घोषणा प्रणाली असून बसण्याची क्षमता ४५ आहे. प्रवाशांनी या वातानुकुलित बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.
आता गडचिरोलीसाठीही शिवशाही बसची सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 20:48 IST
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे टाकत नागपूर-गडचिरोली-नागपूर शिवशाही बसची सेवा १० एप्रिलपासून सुरु केली आहे.
आता गडचिरोलीसाठीही शिवशाही बसची सेवा
ठळक मुद्देप्रवाशांनी या वातानुकुलित बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन