शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आता सरकारी ‘कार्ड’ने करा ‘पेमेंट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 12:37 IST

विविध सेवांच्या पेमेंटसाठी खासगी संस्थांचे अनेक कार्ड उपलब्ध आहेत. आता भारतीय डाक विभागाचेही क्यूआर कार्ड आले आहे.

ठळक मुद्दे१ सप्टेंबर रोजी ‘जीपीओ’मध्ये उद्घाटन

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध सेवांच्या पेमेंटसाठी खासगी संस्थांचे अनेक कार्ड उपलब्ध आहेत. आता भारतीय डाक विभागाचेही क्यूआर कार्ड आले आहे. या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून विजेचे बिल, मोबाईल बिल, डीटीएच रिचार्ज, गॅस बिल व विमा हप्ता आदींचे बिल अदा करता येईल. डाक विभागाला बँकिंगचे लायसन्स मिळाल्यानंतर घेण्यात आलेल्या या पुढाकाराने पोस्टमनचे काम मात्र वाढले आहे.इंडिया पोस्ट पेमेंट बँके(आयपीपीबी)च्या क्यूआर कार्डचे उद्घाटन येत्या १ सप्टेंबर रोजी शहरातील मुख्य पोस्ट आॅफीस(जीपीओ)येथे दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून डाक विभाग आता लोकांना अनेक प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देणार आहे. याचा खातेधारकांना आता रक्कम काढण्याची किंवा जमा करण्यासाठी पोस्ट आॅफिसपर्यंत येण्याची आवश्यकता राहणार नाही. पोस्टमन स्वत:च त्यांच्याकडे असणाऱ्या मोबाईल डिव्हाईसच्या माध्यमातून या सेवा उपलब्ध करून देतील. खातेधारक या कार्डला आपल्या सेव्हिंग अकाऊंटशी लिंक करू शकतात. १ सप्टेंबरपर्यंत हे कार्ड झिरो बॅलेन्सवर उपलब्ध करून दिले जात आहेत.

खाते नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाहीडाक विभागाच्या क्यूआर कार्डसाठी खाते नंबर लक्षात ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही. ते कार्ड खातेधारकाच्या पासबुकसरखेच राहील. आरटीजीएस, एनईएफटी, ईएसएस आदी योजनाही याच्याशी जुळलेल्या राहतील.-मनोहर पत्की, सिनियर पोस्ट मास्तर (जीपीओ)

कॅश बँक सुविधा नाहीसरकारी ‘पेमेंट कार्ड’मध्ये कॅश बँकची सुविधा नाही. सध्या एका पेमेंटसाठी एका सर्वाधिक प्रचलित खासगी कंपनीच्या मोबाईल अ‍ॅपमध्ये कॅश बँक सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय इतर कंपन्याही पेमेंट बँकेच्या क्षेत्रात संचालित आहे. अशा स्पर्धेत आलेल्या डाक विभगाची ही व्यवस्था कुठपर्यंत टिकून राहते, हे पाहावे लागेल. विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र या कार्डला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे. डाक विभागाचे पेमेंट कार्ड मिळविण्यासाठी त्याचे खातेधारक असणे आवश्यक नाही. यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्डसोबत रजिस्ट्रेशन करावे लागेल. नोंदणीसाठी जीपीओमध्ये १ सप्टेंबर रोजी काही काऊंटरही उघडले जातील, जिथे नि:शुल्क रजिस्ट्रेशन केले जाईल.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान