शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आता कुणालाही ‘अभय’ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मालमत्ता कर आणि पाणी कर थकीत असलेल्या नागरिकांसाठी अभय योजना जाहीर केली होती. योजनेला १० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु थकबाकीदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यात ४९५ ...

ठळक मुद्देमनपाने जप्त केल्या ४९५ मालमत्ता : थकबाकी न भरल्यास लिलाव करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मालमत्ता कर आणि पाणी कर थकीत असलेल्या नागरिकांसाठी अभय योजना जाहीर केली होती. योजनेला १० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु थकबाकीदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यात ४९५ मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत.

वाढीव मुदतीतही प्रतिसाद नाहीमालमत्ता व पाणीपट्टीची ४५८ कोटींची थकबाकी होती. थकबाकी वसुलीसाठी १७ जुलै ते ७ आॅगस्ट या कालावधीत अभय योजना राबविण्यात आली. परंतु ३९.३१ कोटींचीच वसुली झाली. या योजनेला प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा तीन दिवस मुदतवाढ देण्यात आली. यात ४.८६ कोटींची थकबाकी वसुली झाली. थकबाकीचा विचार करता वसुली १० टक्केही होऊ शकली नाही.या मालमत्ता जप्त करून हुकूमनामे काढण्यात आले आहे. संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या आहे. मालमत्ता जप्त केल्यानतंर ३१ दिवसात थकबाकी न भरल्यास मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतचा जाहीरनामा प्रकाशित केल्यानतंर १५ दिवसात लिलावाची तारीख निश्चित केली जाणार आहे.जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचे रेडिरेकनरच्या दरानुसार लिलावाची किंमत निश्चित क रण्यात येईल. यातून मालमत्ता कराची थकबाकी, हुकूमनामे व लिलाव प्रक्रियेचा खर्च वसूल करण्यात येईल. त्यानंतर रक्कम शिल्लक असल्यास ती मालमत्ताधारकांना दिली जाणार आहे. गेल्या गुरुवारी थकबाकी वसुलीचा आढावा घेण्यात आला. यात थकबाकी वसुलीसाठी झोनच्या सहायक आयुक्तांना मालमत्ता जप्त करून लिलाव प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार कारवाई सुरू आहे. मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी आॅगस्टपर्यंत अभय योजना राबविण्यात आली. परंतु ४५८ कोटींच्या थकबाकीपैकी ४४.१७ कोटींची वसुली झाली. मालमत्ताकरातून ३० कोटी ४६ लाख ८७ हजारांची वसुली झाली तर पाणीपट्टीतून १३.६१ कोटींचा महसूल जमा झाला आहे.४.५० कोटींची थकबाकीजप्त करण्यात आलेल्या ४९५ मालमत्ताधारकांकडे ४.५० कोटींची थकबाकी आहे. वारंवार नोटीस बजावण्यात आल्यानंतरही ही थकबाकी भरण्यात आलेली नाही. अभय योजनेतही मालमत्ताधारकांनी थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे कर आकारणी व संकलन विभागाने मालमत्ता जप्त क रून लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे.मालमत्ता कर अभय योजनेंतर्गत मालमत्ताधारकांना थकीत करातील दंडाची रक्कम ९० टक्के तर थकीत पाणी बिलावरील विलंब शुल्क किंवा दंडाच्या रकमेत १०० टक्के सूट देण्यात आली होती. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. प्रत्यक्षात या योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मालमत्ता व पाणीकरातून ४४.१७ कोटींची वसुली करण्यात आली. थकबाकी वसुलीसाठी जप्ती मोहीम सक्षम राबविली जाणार आहे.- मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त,कर आकारणी व कर संकलन