शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

आता संत्रा मार्केटमध्येही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : बाजार बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 23:07 IST

कळमन्यातील फळ बाजार आठवड्यातून तीन दिवसच सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने आता संत्रा मार्केटमध्ये व्यापारी, अडतिया, शेतकरी आणि नागरिकांची गर्दी वाढली आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा होत असून, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे कळमना फळ बाजार आठवड्यात तीन दिवसच

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कळमन्यातील फळ बाजार आठवड्यातून तीन दिवसच सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने आता संत्रा मार्केटमध्ये व्यापारी, अडतिया, शेतकरी आणि नागरिकांची गर्दी वाढली आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा होत असून, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. कॉटन मार्केट आणि कळमना भाजी बाजाराप्रमाणेच संत्रा मार्केटही बंद करण्याची मागणी काही सजग नागरिकांनी लोकमतकडे लावून धरली आहे.कोविड-१९ लॉकडाऊनमध्ये कळमन्यातील सर्व बाजारात होणारी गर्दी पाहता, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बाजाराचे वेळापत्रक ठरवून दिले आहे. त्यानुसार फळ बाजार मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुरू राहणार असून, आठवड्यात तीन दिवस बाजार सुरू राहणार असल्याने उर्वरित दिवस फळांची विक्री कुठे करायची, असा प्रश्न अडतिया आणि व्यापाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे एरवी गर्दी नसलेल्या कॉटन मार्केटलगतच्या संत्रा मार्केटमध्ये व्यापारी, अडतिया, उत्पादक शेतकरी आणि नागरिकांची गर्दी होत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा होत आहे.व्यापारी व अडतियांनी निवडला दुसरा पर्यायजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुधवारी कळमना फळ बाजार बंद होता. पण व्यापारी आणि अडतियांनी फळांच्या गाड्या संत्रा मार्केटमध्ये बोलविल्या. व्यापारी आणि अडतियांनी या ठिकाणी संत्र्याचा लिलावही करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाली. कळमन्याच्या तुलनेत संत्रा मार्केटमध्ये जागा फारच कमी आहे. एवढ्याशा जागेत बुधवारी सकाळी ७ ते १० या वेळेत पाच हजारापेक्षा जास्त लोकांची गर्दी होती, अशी माहिती आहे.संत्र्याच्या हंगामाचे काहीच दिवस उरले आहेत. याशिवाय अननस, द्राक्षांचा मोसम सुरू आहे. कळमन्यात नागपूर जिल्ह्यातून संत्री, महाराष्ट्रातून द्राक्षे आणि अन्य राज्यातून विविध फळांची आवक सुरू आहे. मार्च ते मे महिन्यात फळांची दररोज सर्वाधिक आवक असते. त्यामुळे एक दिवसाआड फळांची विक्री करणे उत्पादक आणि व्यापाºयांना परवडणारे नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांचे लक्ष नसलेल्या संत्रा मार्केटचा पर्याय व्यापारी आणि अडतियांनी निवडल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार