शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आता गुळणीतूनही हाेऊ शकेल काेराेना टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:08 IST

नागपूर : घशावाटे किंवा नाकावाटे स्राव घेऊन काेराेना आजाराची चाचणी करणे बहुतेकांसाठी मनस्ताप देणारे ठरते. मात्र यापुढे हा त्रास ...

नागपूर : घशावाटे किंवा नाकावाटे स्राव घेऊन काेराेना आजाराची चाचणी करणे बहुतेकांसाठी मनस्ताप देणारे ठरते. मात्र यापुढे हा त्रास सहन करावा लागणार नाही. साध्या गुळणीच्या माध्यमातून काेराेनाचे निदान करणे आता शक्य झाले आहे. नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (निरी)ने काेराेना टेस्टिंगसंदर्भात एक माेठे संशाेधन केले आहे. या पद्धतीला ‘सलाईन गारगल आरटी-पीसीआर टेस्ट’ असे नाव देण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे आयसीएमआरने या संशाेधनाला मान्यता दिली. नागपुरातूनच या टेस्टिंग पद्धतीला सुरुवात हाेणार असून, पुढे देशभर त्याचा वापर केला जाईल.

नाकावाटे स्राव घेताना हाेणाऱ्या झिणझिण्या त्रासदायक असतात. अनेकांना नाकावाटे व घशावाटे नमुने देताना इजा झाल्याच्या घटना पुढे आल्या होत्या. अनेकांना नमुने देताना हायपर टेन्शनचा त्रास होत असल्याचेही समाेर आले. सध्या आरटीपीसीआर चाचणीसाठी नाकावाटे किंवा घशातून स्वॅब घेऊन रासायनिक द्रव्य असलेल्या ट्यूबमध्ये टाकला जाताे. प्रयाेगशाळेत पाठविल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया हाेतात. स्वॅबमधील विविध कणांमधून आरएनए वेगळा केला जाताे. ताे आरएनए कशाचा आहे, यावरून काेराेना झाला आहे की नाही, हे लक्षात येते. त्यासाठी सुसज्ज प्रयाेगशाळा आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते. त्यानंतरही चाचणी पूर्ण व्हायला चार तास लागतात. आता हा त्रास कमी होणार आहे. निरीच्या व्हायरालाॅजी विभागाचे डाॅ. कृष्णा खैरनार यांनी हे नवे तंत्र विकसित केले आहे. काेराेना टेस्टींगसंदर्भात हे संशाेधन उपयुक्त मानले जात आहे.

या टेस्टिंग प्रक्रियेत आरएनए एक्स्ट्रॅक्शनची गरज संपणार असून कमी वेळात काेराेना अहवाल प्राप्त हाेणे शक्य हाेणार असल्याचा दावा डाॅ. खैरनार यांनी व्यक्त केला. आयसीएमआरच्या मान्यतेमुळे नागपुरात ही प्रक्रिया सुरू हाेणार असून, शहरातील प्रयाेगशाळांना याबाबत माहिती व मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये आराेग्य कर्मचाऱ्यांची गरज पडणार नाही. केवळ संबंधित व्यक्तीने सलाईन वाॅटरच्या १५ मिनिटे गुळण्या करून ते नमुने प्रयाेगशाळेत देता येईल. पाण्याची घनता हवेपेक्षा ८०० पट अधिक असते. सलाईनच्या पाण्याच्या गुळण्यांमुळे विषाणू त्यामध्ये येईल व त्याला सहन ट्रेस करता येईल.

असे हाेतील फायदे

- नाकावाटे व घशावाटे स्वॅब घेताना हाेणारा त्रास कमी हाेईल.

- प्रशिक्षित आराेग्य कर्मचाऱ्यांची गरज पडणार नाही.

- सलाईन वाॅटरने घरी गुळण्या करून ते सॅम्पल प्रयाेगशाळेत देता येईल.

- तपासणीसाठी लांब रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे गर्दीही टाळता येणार आहे.

- काेराेनाचा अहवाल कमी वेळात प्राप्त करणे शक्य हाेईल.

- नमुने गाेळा करताना हाेणारा वैद्यकीय कचरा कमी हाेईल.