शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाऊ इंडिया इज नंबर वन

By admin | Updated: September 27, 2014 02:40 IST

आतापर्यंत भारताचा तिसऱ्या, चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर उल्लेख केला जात होता. मंगळ मोहीम यशस्वी झाल्यामुळे भारत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

नागपूर : आतापर्यंत भारताचा तिसऱ्या, चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर उल्लेख केला जात होता. मंगळ मोहीम यशस्वी झाल्यामुळे भारत पहिल्या क्रमांकावर आला आहे. ‘नाऊ इंडिया इज नंबर वन’ अशा भावना माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी व्यक्त केल्या.विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी) नागपूरतर्फे आयोजित ‘अ‍ॅक्सिस-२०१४’ वार्षिक तांत्रिक प्रदर्शनाचे आज, शुक्रवारी कलाम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष विश्राम जामदार, संचालक नरेंद्र चौधरी, प्रदर्शनाचे प्रभारी डॉ. यशवंत काटपाताळ व डॉ. जे. पी. सिंग व्यासपीठावर उपस्थित होते.व्हीएनआयटी परिसरातील हिरवळ पाहून कलाम प्रभावित झाले. वातावरणातील कार्बनडाय आॅक्साईड कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने वृक्ष संवर्धनाचा पण केल्यास एक सुंदर भारत घडविता येईल, असे ते म्हणाले. आपण अनेक अचंबित करणारे वैज्ञानिक शोध लावले. त्या-त्या वैज्ञानिकांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून तुम्ही स्वत:लाच विचारा की आपण काय मिळविले. अविष्कार घडविण्यासाठी समर्पणाची भावना, आत्मविश्वास व परिश्रम आवश्यक आहे. तेव्हाच तुम्हाला हवे ते प्राप्त करता येईल, असे सांगून कलाम यांनी ‘आय विल फ्लाय’ कविता ऐकविली. जीवनात नेहमीच समस्या येत असतात. समस्यांना स्वत:वर हावी होऊ देऊ नका. तंत्रज्ञानात अपयश येतच असते. समस्यांवर मात करा. यशस्वी होण्यासाठी हे आवश्यक आहे. कोणत्याही एका क्षेत्राची निवड करून नवनवीन शोध लावा, असे आवाहन कलाम यांनी केले. (प्रतिनिधी)