शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वन्यक्षेत्रातील इथ्यंभूत माहितीसाठी आता ‘जीआयएस’ प्रणाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 12:45 IST

वनाच्छादनामुळे होणारा बदल, अवैध वृक्षतोड, वनीकरण, वणव्यांचे नियंत्रण, वन्यजीवांचे ठिकाण निश्चित करणे, मानव-वन्यजीव संघर्ष यासारखी खडान्खडा माहिती गोळा करण्यासाठी वन विभागातर्फे राज्यात जिआॅग्राफिक इन्फॉर्मेशन सेंटर (जीआयएस) उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव यांची माहितीवन विभागाची तंत्रज्ञानात झेप

आॅनलाईन लोकमतनागपूर : वनाच्छादनामुळे होणारा बदल, अवैध वृक्षतोड, वनीकरण, वणव्यांचे नियंत्रण, वन्यजीवांचे ठिकाण निश्चित करणे, मानव-वन्यजीव संघर्ष यासारखी खडान्खडा माहिती गोळा करण्यासाठी वन विभागातर्फे राज्यात जिआॅग्राफिक इन्फॉर्मेशन सेंटर (जीआयएस) उभारण्यात येणार आहे. ‘जीआयएस’ द्वारे राज्यातील वनसंपत्ती, वन्यजीवांवर नजर ठेवण्यात येईल, अशी माहिती तंत्रज्ञान विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत दिली.राज्यातील वनसंपत्ती, वन्यजीवांवर जीआयएसची नजर राहणार आहे. डिसेंबर महिन्यापासून ‘जीआयएस’ला प्रारंभ होईल.‘जीआयएस’चे नागपूर आणि पुणे येथे दोन केंद्र तर तिसरे केंद्र वन विभागाच्या मुख्यालयात नागपुरात राहील. भारतातील प्रत्येक राज्याने स्वतंत्र जीआयएस कक्ष स्थापन करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशानंतर वन विभागाने संबंधित हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर विकत घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. वन विभागाने आपले स्वतंत्र जीआयएस सेंटर स्थापन केले आहे. यापूर्वी फॉरेस्ट सर्व्हे आॅफ इंडियाकडून विविध माहिती मागविण्याची पद्धत होती. आता, वन विभाग स्वत:च्या स्तरावर जंगलांची संपूर्ण माहिती गोळा करू शकणार आहे. जंगलातील प्रत्येक कम्पार्टमेंटची माहिती या सेंटरमुळे उपलब्ध होणार आहे. मागील वर्षी राज्यात किती वनाच्छादन होते आणि यावर्षी ते किती आहे, याचा अंदाज यामुळे येईल. नेमके कोणत्या भागात जंगल कमी किंवा जास्त झाले आहे, हे सुद्धा या यंत्रणेमुळे कळणार असून, त्या आधारे परिस्थिती सुधारण्यासाठी स्थानिक कर्मचाºयांना आदेश देण्यात येतील. वणवा, मानव-वन्यप्राणी संघर्ष अशा बाबतीत तातडीने उपाययोजना करण्यासाठी या माहितीचा फायदा होणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव यांनी सांगितले. जीआयएस पद्धतीने मिळालेली माहिती वेब पोर्टलवर उपलब्ध राहणार असून, ती सर्व वनाधिकाºयांना पाहता येईल. या पद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. यात औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर आणि चंद्रपूर वनवृत्तातील वनाधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.हे कर्मचारी प्रशिक्षित झाल्यानंतर प्रत्येक वनवृत्तात अशी प्रशिक्षणे घेण्यात येतील. देशातील प्रत्येक राज्यात वनांचा विकास किती झाला, यावर केंद्र सरकारच्या वन मंत्रालयाचे लक्ष असते. नव्या ‘जीआयएस’च्या मदतीने मिळालेली माहिती केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान