शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

आता अतिरिक्त पार्किंगची सक्ती

By admin | Updated: September 24, 2016 00:58 IST

शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक पावले उचलली आहेत.

मॉल, हॉस्पिटलसह अपार्टमेंटमध्ये व्हिजिटर्ससाठी पाच टक्के अतिरिक्त पार्किंग नागपूर : शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक पावले उचलली आहेत. नगर विकास विभागातर्फे जारी करण्यात आलेल्या नागपूर शहराच्या सुधारित विकास योजनेत पार्किंग स्थळांच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. यानुसार आता कोणतेही नवे बांधकाम करताना दुकान, शॉपिंग मॉल, हॉस्पिटल व निवासी अपार्टमेंटमध्येही आगंतुकासाठी (व्हिजिटर्स) अतिरिक्त पाच टक्के पार्किंगची व्यवस्था करावी लागेल. तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये नियमित पार्किंग व्यवस्थेसह आगंतुकांसाठी २० टक्के अतिरिक्त पार्किंगची व्यवस्था करावी लागणार आहे. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने २० सप्टेंबर २०१६ रोजी या संबंधीची अधिसूचना जारी केली आहे. यानुसार आता निवासी अपार्टमेंटमध्ये १५० वर्गमीटरहून अधिक क्षेत्रासाठी दोन कार, दोन स्कूटर, दोन सायकल (कन्झेस्टेड-नॉन कंन्झेस्टेड एरिया), १०० ते १४९ वर्ग मीटरसाठी एक कार, दोन स्कूटर, दोन सायकल पार्क करण्याची जागा राखीव असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या जागेशिवाय आगंतुकांसाठी ५ टक्के अतिरिक्त पार्किंगची व्यवस्था करावी लागेल.बेसमेंटमध्ये पार्किंग आवश्यकनगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी आर.एस. चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या या अधिसूचनेची प्रत महापालिका आयुक्त, नासुप्र सभापती, नागपूर विभागातील नगर रचना विभागचे विभागीय संयुक्त संचालक यांना पाठविण्यात आली आहे. अधिसूचना शासकीय राजपत्रात प्रकाशित होताच तिची अंमलबजावणी केली जाईल. विकास नियंत्रण नियमावलीमध्ये बदल तकीत इमारतीच्या तळ मजल्यावर (बेसमेंट) पार्किंगची व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात आले आहे. १००० वर्ग मीटरच्या भूखंडासाठी सिंगल बेसमेंट, १००१ ते २००० वर्ग मीटरच्या भूखंडासाठी टू टियर बेसमेंट, २००१ वर्गमीटरपेक्षा मोठ्या भूखंडासाठी थ्री टियर बेसमेंटची परवानगी दिली जाईल. विशेष म्हणजे पार्किंगसाठी बेसमेंट तयार करताना त्याची क्षमता फायर इंजिनिअरिंगच्या माध्यमातून तपासणे आवश्यक असेल. एखादी इमारत बहुपयोगी असेल तर त्या इमारतीच्या बेसमेंटच्या सभोवताल सुरक्षा भिंत बांधता येणार नाही. (प्रतिनिधी)