शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे वीजदेयक आता ‘मोबाईल’ वर

By admin | Updated: August 10, 2016 02:32 IST

सार्वजनिक क्षेत्रातील वीज वितरण कंपनी महावितरणतर्फे आपल्या ग्राहकांना अधिक तत्पर सेवा देण्यासाठी आता पुन्हा एक खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

‘एसएमएस’ : १ लाख ३९ हजार मोबाईल क्रमांकांची नोंदणी नागपूर : सार्वजनिक क्षेत्रातील वीज वितरण कंपनी महावितरणतर्फे आपल्या ग्राहकांना अधिक तत्पर सेवा देण्यासाठी आता पुन्हा एक खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यात महावितरणतर्फे वीज ग्राहकांच्या मोबाईलवर वीज देयकाच्या संदेशासह ‘एसएमएस’ वीज बंद असल्यास त्या कालावधीची माहिती देणारा ‘एसएमएस’ पाठविला जाणार आहे. परंतु यासाठी वीजग्राहकांनी महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये स्वत:च्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी, असे महावितरणतर्फे आवाहन करण्यात आले आहे. त्याचवेळी आतापर्यंत नागपूर परिमंडलातील तब्बल १ लाख ३९ हजार ७८२ वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी पूर्ण केली आहे. शिवाय त्यांना महावितरणकडून वीजदेयकाचा एसएमएस पाठविला जात आहे. तसेच महावितरणने कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या ‘कर्मचारी मित्र’ या मोबाईल अ‍ॅपद्वारे वीजपुरवठा बंद असलेल्या वीज वाहिनीची नोंद घेण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित वीजवाहिनीवरील वीजग्राहकांच्या मोबाईलवर वीज बंदबाबतच्या कालावधीची माहिती ह्यएसएमएसह्ण द्वारे कळविण्यात येईल. महावितरणने वीजग्राहकांना मोबाईल क्रमांक किंवा ई-मेलची नोंदणी करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार महावितरणच्या ९२२५५९२२५५ या क्रमांकावर ह्यएसएमएसह्ण द्वारे वीजग्राहकांना स्वत:चा ई-मेल आयडी किंवा मोबाईल क्रमांकाची नोंदणी करता येणार आहे. याशिवाय महावितरणच्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्रात ग्राहकांना मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)