शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

आता ‘अ‍ॅग्रो एमएसएमई’ची संकल्पना; नितीन गडकरींचा सहकारी बँक संचालकांशी ई-संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 11:36 IST

केंद्र शासनाने ‘अ‍ॅग्रो एमएसएमई’ची नवीन संकल्पना सादर केली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात वन व कृषी उत्पादनाच्या प्रक्रियेवर ही संकल्पना आधारित असेल. उद्योगांच्या विकेंद्रीकरणासाठी नवीन उद्योग ग्रामीण परिसरात स्थापन करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमुंबई-दिल्ली महामार्गावर विकसित होणार स्मार्ट गाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाने ‘अ‍ॅग्रो एमएसएमई’ची नवीन संकल्पना सादर केली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात वन व कृषी उत्पादनाच्या प्रक्रियेवर ही संकल्पना आधारित असेल. उद्योगांच्या विकेंद्रीकरणासाठी नवीन उद्योग ग्रामीण परिसरात स्थापन करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. गुरुवारी त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकांचे संचालक, सदस्यांशी ई-संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.मुंबई-दिल्लीदरम्यान १ लाख कोटी रुपयांच्या खर्चातून महामार्ग तयार करण्यात येत आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना स्मार्ट गाव विकसित करण्याचा प्रयत्न आहे. या दिशेने महाराष्ट्र सरकारनेदेखील पुढाकार घेतला पाहिजे. त्यामुळे वन व आदिवासी क्षेत्राचा विकास होईल. देशात ७ हजार ५०० किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. यातील साडेसातशे किलोमीटर क्षेत्र महाराष्ट्रातच आहे. राज्यातील १८ टक्के जनता समुद्राजवळच्या पट्ट्यात राहते. आता ट्रॉलर तंत्रज्ञानाने समुद्रात १०० नॉटिकल मैल जाऊन मासेमारी करता येऊ शकणार आहे. सहकारी बँकांनी आता या क्षेत्रांकडे लक्ष दिले पाहिजे. एमएसएमईच्या योजनांंतर्गत सहकारी बँकांनादेखील कर्ज देण्यासाठी अधिकृत परवानगी आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.धान्यापासून इथेनॉल बनवावेदेशात गहू, तांदूळ यासारख्या धान्याचा तीन वर्षांचा साठा उपलब्ध आहे. काही धान्य तर अक्षरश: खराब होत आहे. या धान्यापासून इथेनॉल तयार केले पाहिजे. सरकारने धान्यापासून इथेनॉल तयार करण्याची परवानगी दिली आहे. साखर कारखान्यांमध्ये साखरेच्या जागी इथेनॉल तयार केल्याने अर्थव्यवस्थेला मजबुती मिळेल. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर येथील काही कारखान्यांना पुनरुज्जीवित करण्यात आले तर शेतकऱ्यांवरील संकट दूर होईल. केंद्र एक लाख कोटी रुपयांचे इथेनॉल घ्यायला तयार आहे. परंतु ते उपलब्ध नसल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.सहकार कायद्यात संशोधन आवश्यकसहकार क्षेत्राला सरकारच्या नियंत्रणातून बाहेर काढण्यासाठी कायद्यात संशोधन आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील या दिशेने प्रयत्न केले होते. एका सहकारी बँकेला दुसºया बँकेत विलीन करण्याची परवानगी असली पाहिजे, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :agricultureशेती