शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

आता रंग, गंध-सुवास, आवाजाचीही बाैद्धिक संपदा!; भारताला अमर्याद संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 02:18 IST

पुनिता जैन : साधारणपणे आयपी म्हणजे पेटन्ट एवढेच शिकल्यासवरल्या लोकांनाही वाटते. प्रत्यक्षात रोजच्या जगण्यातल्या प्रत्येक गोष्टीचा संबंध बाैद्धिक संपदेशी आहे

नागपूर : चित्रपट, पुस्तकांचे काॅपीराईट किंवा वैज्ञानिक शोध, उपकरणांच्या पेटन्टपुरते मर्यादित असलेले बाैद्धिक संपदेचे जग आता इतके विस्तारले आहे, की पुढच्या काळात एखादा रंग, गंध, सुवास आणि विशिष्ट आवाजाचीही नोंद इंटेलेक्चुअल प्राॅपर्टी म्हणजे ‘आयपी’अंतर्गत होईल. पाश्चात्य जग याबाबत खूप पुढे असून,  खानपान, वेशभूषा आदींबाबत प्रचंड विविधता असलेल्या भारताला सजग राहावे लागेल. या क्षेत्रात अमर्याद संधी असतील, असे या विषयाच्या तरुण अभ्यासक, रायपूरच्या पुनिता जैन यांचे म्हणणे आहे. मुंबईच्या किरीट मेहता विधी महाविद्यालयातून फॅशन लाॅमध्ये कायद्याची पदवी घेतलेल्या पुनिता जैन यांनी नुकतीच अमेरिकेतील येशिवा विद्यापीठाच्या बेंजामिन कार्डोझो स्कूल ऑफ लाॅमधून एलएलएम पदवी प्राप्त केली असून, युवा पिढीच्या दृष्टीने या अगदीच नव्या विषयाच्या संधीची क्षितिजे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना उलगडून सांगितली. यवतमाळ येथील ॲड. अमरचंद दर्डा यांची पुनिता ही नात आहे. 

त्या म्हणाल्या, की साधारणपणे आयपी म्हणजे पेटन्ट एवढेच शिकल्यासवरल्या लोकांनाही वाटते. प्रत्यक्षात रोजच्या जगण्यातल्या प्रत्येक गोष्टीचा संबंध बाैद्धिक संपदेशी आहे. खाण्यापिण्याच्या चिजा, वस्त्रप्रावरणे, फॅशनमधील प्रत्येक वस्तूंचा यात समावेश होतो. आता तर रंग, गंध, आवाज अशा कल्पनेपलीकडील बाबींची आयपी म्हणून नोंद होते. उदा. डेअरी मिल्कच्या उत्पादनांचा खास जांभळा रंग ही त्या कंपनीची बाैद्धिक संपदा आहे. टिफनीचा परफ्यूम उत्पादनांचा निळा रंग ही त्यांचीच खासियत आहे. ख्रिश्चन लोब्युटिन पादत्राणांच्या तळव्याचा रंग हा त्यांचा आयपी आहे. युरोप, अमेरिका याबाबत अधिक जागरूक आहेत. भारतात दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे कायदे असले तरी या विषयाची सखोल माहिती व्यावसायिक व तज्ज्ञांना नाही. दहा-बारा वर्षांपूर्वी ट्रेडमार्कबाबत सिंगापूर करार झाला. परंतु, भारताने तो अद्याप मान्य केलेला नाही.

युवा पिढीपुढे कर्तबगारीचे नवे अवकाशनानाविध प्रकारचे खाण्याचे पदार्थ, विविधरंगी वेशभूषा, लोकसंस्कृतीची अनेक वैशिष्ट्ये अशा विविधतेने नटलेल्या भारतात या बाैद्धिक संपदेच्या नव्या जागतिक प्रवाहामुळे अमर्याद संधी आहेत. प्रत्येक प्रदेशाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. अगदी गंगाजलालादेखील जीआय मानांकन मिळू शकते. तेव्हा या सगळ्यांची योग्य नोंदणी व रक्षणाच्या निमित्ताने युवा पिढीसमाेर कर्तबगारीचे नवे अवकाशही खुले होणार आहे, असे पुनिता जैन म्हणाल्या. 

असे आहेत प्रकारपेटन्ट, ट्रेडमार्क, ट्रेड सिक्रेट, इंडस्ट्रिअल डिझाईन, काॅपीराईट किंवा जिओग्राफिकल इंडिकेटर्स (जीआय) आदी बाौद्धिक संपदेचे प्रकार आहेत. प्राचीन ग्रंथसंपदेच्या मदतीने अमेरिकेसोबत हळदीच्या पेटन्टची लढाई आपण जिंकली. बासमती तांदळाचेही असेच झाले. कोल्हापुरी चप्पल, दार्जिलिंग चहा वा नागपुरी संत्रा ही ‘जीआय’ म्हणजे भाैगोलिक मानांकनाची उदाहरणे आहेत. पॅरिसचा आयफेल टाॅवर किंवा सिडनीचे ऑपेरा हाऊस ही वारसास्थळे संपदा म्हणून नोंद आहेत. मॅकडोनाल्ड, कोकाकोला, पेप्सीच्या उत्पादनांची विशिष्ट चव हे त्यांचे ट्रेड सिक्रेट आहे, असे पुनिता जैन यांनी सांगितले.