शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

आता रंग, गंध-सुवास, आवाजाचीही बाैद्धिक संपदा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 10:33 IST

Nagpur News science पुढच्या काळात एखादा रंग, गंध, सुवास आणि विशिष्ट आवाजाचीही नोंद इंटेलेक्चुअल प्राॅपर्टी म्हणजे ‘आयपी’अंतर्गत होईल.

ठळक मुद्देसांस्कृतिक विविधतेने नटलेल्या भारताला अमर्याद संधी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : चित्रपट, पुस्तकांचे काॅपीराईट किंवा वैज्ञानिक शोध, उपकरणांच्या पेटन्टपुरते मर्यादित असलेले बाैद्धिक संपदेचे जग आता इतके विस्तारले आहे, की पुढच्या काळात एखादा रंग, गंध, सुवास आणि विशिष्ट आवाजाचीही नोंद इंटेलेक्चुअल प्राॅपर्टी म्हणजे ‘आयपी’अंतर्गत होईल. पाश्चात्य जग याबाबत खूप पुढे असून, खानपान, वेशभूषा आदींबाबत प्रचंड विविधता असलेल्या भारताला सजग राहावे लागेल. या क्षेत्रात अमर्याद संधी असतील, असे या विषयाच्या तरुण अभ्यासक, रायपूरच्या पुनिता जैन यांचे म्हणणे आहे.

मुंबईच्या किरीट मेहता विधी महाविद्यालयातून फॅशन लाॅमध्ये कायद्याची पदवी घेतलेल्या पुनिता जैन यांनी नुकतीच अमेरिकेतील येशिवा विद्यापीठाच्या बेंजामिन कार्डोझो स्कूल ऑफ लाॅमधून एलएलएम पदवी प्राप्त केली असून, युवा पिढीच्या दृष्टीने या अगदीच नव्या विषयाच्या संधीची क्षितिजे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना उलगडून सांगितली. यवतमाळ येथील अ‍ॅड. अमरचंद दर्डा यांच्या कन्येची पुनिता ही कन्या आहे.

त्या म्हणाल्या, की साधारणपणे आयपी म्हणजे पेटन्ट एवढेच शिकल्यासवरल्या लोकांनाही वाटते. प्रत्यक्षात रोजच्या जगण्यातल्या प्रत्येक गोष्टीचा संबंध बाैद्धिक संपदेशी आहे. खाण्यापिण्याच्या चिजा, वस्त्रप्रावरणे, फॅशनमधील प्रत्येक वस्तूंचा यात समावेश होतो. आता तर रंग, गंध, आवाज अशा कल्पनेपलीकडील बाबींची आयपी म्हणून नोंद होते. उदा. डेअरी मिल्कच्या उत्पादनांचा खास जांभळा रंग ही त्या कंपनीची बाैद्धिक संपदा आहे. टिफनीचा परफ्यूम उत्पादनांचा निळा रंग ही त्यांचीच खासियत आहे. ख्रिश्चन लोब्युटिन पादत्राणांच्या तळव्याचा रंग हा त्यांचा आयपी आहे.

पेटन्ट, ट्रेडमार्क, ट्रेड सिक्रेट, इंडस्ट्रिअल डिझाईन, काॅपीराईट किंवा जिओग्राफिकल इंडिकेटर्स (जीआय) आदी बाौद्धिक संपदेचे प्रकार आहेत. कोरोना विषाणू प्रतिबंधक लस हा पेटन्टचा विषय आहे. आपण प्राचीन ग्रंथसंपदेच्या मदतीने अमेरिकेसोबत हळदीच्या पेटन्टची लढाई जिंकली. बासमती तांदळाचेही असेच झाले. कोल्हापुरी चप्पल, दार्जिलिंग चहा किंवा नागपुरी संत्रा ही ‘जीआय’ म्हणजे भाैगोलिक मानांकनाची उदाहरणे आहेत. पॅरिसचा आयफेल टाॅवर किंवा सिडनीचे ऑपेरा हाऊस ही वारसास्थळे संपदा म्हणून नोंद आहेत. असेच ताजमहालाबाबत होऊ शकेल. मॅकडोनाल्ड, कोकाकोला, पेप्सीच्या उत्पादनांची विशिष्ट चव हे त्यांचे ट्रेड सिक्रेट आहे, असे पुनिता जैन यांनी सांगितले.

रोजच्या वापरातील प्रत्येक वस्तूचे वैशिष्ट्य बाैद्धिक संपदा असेल व तिची योग्य नोंदणी झाली नसेल तर खटला उभा राहिला तर ते सिद्ध कसे करणार, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, की त्यांचा पहिला वापर कुणी केला यावर ते सिद्ध होते. इंटेलेक्चुअल प्राॅपर्टी (आयपी) हे मानवी बुद्धिमत्ता मोजण्याचे एकक तर वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्राॅपर्टी ऑर्गनायझेशन (वायपो) ही तिच्या आविष्काराचे संरक्षण करणारी जागतिक व्यवस्था. भारतासह बहुतेक सर्व देश या संघटनेचे सदस्य आहेत. सर्व प्रकारच्या बाैद्धिक संपदेचे संरक्षण, त्यासाठी कायदे, त्यांची अंमलबजावणी यांची वायपो संस्था देखरेख करते. अर्थात, सगळ्या देशांमध्ये कायदे सारखे नाहीत. युरोप, अमेरिका याबाबत अधिक जागरूक आहेत. भारतात दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे कायदे असले तरी या विषयाची सखोल माहिती व्यावसायिक व तज्ज्ञांना नाही. दहा-बारा वर्षांपूर्वी ट्रेडमार्कबाबत सिंगापूर करार झाला. परंतु, भारताने तो अद्याप मान्य केलेला नाही.

युवा पिढीपुढे कर्तबगारीचे नवे अवकाश

नानाविध प्रकारचे खाण्याचे पदार्थ, विविधरंगी वेशभूषा, लोकसंस्कृतीची अनेक वैशिष्ट्ये अशा विविधतेने नटलेल्या भारतात या बाैद्धिक संपदेच्या नव्या जागतिक प्रवाहामुळे अमर्याद संधी आहेत. प्रत्येक प्रदेशाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. अगदी गंगाजलालादेखील जीआय मानांकन मिळू शकते. तेव्हा या सगळ्यांची योग्य नोंदणी व रक्षणाच्या निमित्ताने युवा पिढीसमाेर कर्तबगारीचे नवे अवकाशही खुले होणार आहे, असे पुनिता जैन म्हणाल्या.

—————————————————-

टॅग्स :scienceविज्ञान