शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

होळीच्या पर्वावर भांग चॉकलेट स्वरुपात; शाळकरी व युवकांमध्ये वाढले व्यसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 12:09 IST

शहरात सहज मिळणाऱ्या अफू, चरस, गांजापासून ते खोकल्याचे सिरप, झोपेच्या गोळ्या, व्हाईटनरच्या नशेच्या विळख्यात नागपुरातील तरुणाई अडकली जात आहे. आता यात भर पडली आहे ती म्हणजे ‘मस्ताना मनुक्का’च्या नावावर भांग चॉकलेटची.

ठळक मुद्दे‘मस्ताना मनुक्का’ नावाने धडाक्यात विक्री

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात सहज मिळणाऱ्या अफू, चरस, गांजापासून ते खोकल्याचे सिरप, झोपेच्या गोळ्या, व्हाईटनरच्या नशेच्या विळख्यात नागपुरातील तरुणाई अडकली जात आहे. आता यात भर पडली आहे ती म्हणजे ‘मस्ताना मनुक्का’च्या नावावर भांग चॉकलेटची. होळीच्या पर्वावर पानठेल्यापासून ते किरणा दुकानात हे चॉकलेट सर्रास उपलब्ध झाले आहे. याच्या गर्तेत शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते तरुण सापडला असून व्यसन वाढत असल्याचे चित्र आहे.केवळ जिज्ञासेपोटी अमली पदार्थांची चव चाखणारे पुढे याच्या विळख्यात आपसूकच सापडतात. सुरुवातीला कुणीही अमली पदार्थ व्यसनाधीन होण्यासाठी सेवन करीत नाही. मात्र हळूहळू जेव्हा याचे सेवन वाढते तेव्हा ते कधी अडकले हे त्यांनाही कळत नाही. ‘मस्ताना मनुक्का’च्या बाबतीत असेच होत आहे. केवळ पाच रुपयाचे मिळणारे हे चॉकलेट सलग चार-पाच दिवस खाल्ल्यानंतरच याचे व्यसन लागत असल्याचे एका युवकाने सांगितले. त्याला बोलते केल्यावर दुधात मिसळून हे चॉकलेट खाल्ल्यास याची नशा वाढत असल्याचे त्याने सांगितले.  हे चॉकलेट पानठेलेवाले किंवा दुकानदार सामान्यांना देत नसल्याचे ‘लोकमत’ चमूला आढळून आले. अनेक जण चार-पाच चॉकलेट खाऊन दिवसभर नशेत राहत असल्याचे यातीलच एका तरुणाने सांगितले.आयुर्वेदिक औषधाच्या नावावर भांग‘मस्ताना मनुक्का’ चॉकलेच्या वेष्टनावर आयुर्वेदिक औषध असे लिहिले आहे. आतील चॉकलेट हिरव्या रंगाचे असून चव कडवट आहे. रेल्वे स्थानकाच्या परिसरापासून मध्यवर्ती बसस्थानक, सीताबर्डी, धरमपेठ, भगवाघर परिसर, मेयो चौक परिसर, मेडिकल चौक, मोमीनुपरा, बाबा बुद्धाजीनगर, इंदोरा, भांडेवाडी, मानेवाडा, झिंगाबाई टाकळी, गोरेवाडा या परिसरातील निवडक पानठेले व दुकानांवर या चॉकलेटची सर्रास विक्री होत असल्याचे ‘लोकमत’चमूला आढळून आले.वैद्याच्या सल्ल्यानुसार खाण्याचा इशाराया चॉकलेटच्या वेष्टनाच्या मागील भागात ‘शेड्यूल ई’ असे लिहून केवळ वैद्याच्या सल्ल्यानंतरच खाण्याचा इशारा लिहिला आहे. या शिवाय एक किंवा दोन गोळी जेवणाच्या एक तासानंतर चोखण्याचा सल्लाही दिला आहे. यात शक्तिवर्धकापासून ते त्रिदोषनाशक घटक असल्याचेही नमूद आहे. मध्य प्रदेशातील इंदोर येथील हे उत्पादन आहे.अशी चढते नशाया चॉकलेटची नशा करणाऱ्या एका युवकाने सांगितले की, चार-पाच चॉकलेट खाल्ल्यावर हळूहळू आपल्या आजूबाजूला काय चालले आहे, यापासून अनभिज्ञ होत जातो. वेगळीच तंद्री लागते. झोप येते. काही जण हे चॉकलेट खाल्यावर बडबडायला लागतात. कुणी खातच राहतात, तर कुणी हसतच राहतात. चार दिवस सलग ही चॉकलेट खाल्ल्यास याचे व्यसन लागत असल्याचेही त्या युवकाने सांगितले.

केवळ शाळकरी व तरुणांनाच विक्री‘मस्ताना मनुक्का’ नावाने विक्री होणारे हे चॉकलेट पानठेलेवाले किंवा दुकानदार सामान्यांना देत नसल्याचे ‘लोकमत’ चमूला आढळून आले. गुरुवारी चमूने विविध पानठेल्यावर या चॉकलेटची मागणी केल्यावर अनेकांनी नकार दिला. परंतु याच चॉकलेटसाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पानठेल्यावाल्याकडे पाठविले असता त्यांना ते सहज मिळाले. अनेक जण चार-पाच चॉकलेट खाऊन दिवसभर नशेत राहत असल्याचे यातीलच एका तरुणाने सांगितले.यकृताला नुकसान पोहचवितेभांग खाल्ल्याने मेंदूवर प्रभाव पडतो. यकृताचा त्रास असणाºयांना किंवा दारूमध्ये मिसळून भांग खाणाऱ्यांच्या यकृताला नुकसान पोहचविते. विशेष म्हणजे, रक्तवाहिनीत रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका असतो.-डॉ. अमोल समर्थ

 

टॅग्स :Holi 2018होळी २०१८