शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आता मेयो, मेडिकलमध्ये होणार मानसिकदृष्ट्या लैंगिक समस्यांवर उपचार; मेंटल हेल्थ लॅबसाठी आले यंत्र सामूग्री

By सुमेध वाघमार | Updated: April 25, 2024 20:00 IST

संशोधनातही होणार मदत

सुमेध वाघमारे 

नागपूर : अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णांपासून ते स्मृतिभ्रंश, अल्झायमर, मेंदूला दुखापती, निद्रानाशासह मानसिकदृष्ट्या लैंगिक समस्यांवर मेयो, मेडिकलमध्ये उपचाराची सोय होणार आहे. यासाठी या दोन्ही रुग्णालयाच्या मानसिक रोग विभागात ‘मेंटल हेल्थ लॅब’ सुरू होत आहे. याला लागणारे आवश्यक यंत्र सामूग्री नुकतीच उपलब्ध झाली आहे.   रोजच्या आयुष्यातील ताणतणावामुळे मानसिक आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्यांचे महत्व अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी अद्ययावत यंत्राचा मदतीने निदान व उपचारासोबतच संशोधन होण्यासाठी  ‘मे लॉजिकमॅक्स टेक्नॉलॉजी प्रा.लि. पुणे’ यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला ‘मेंटल हेल्थ लॅब टर्न की प्रोजेक्ट’चा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची गरज व उपयुक्तता तपासणीसाठी पाच सदस्यांची समीती स्थापन करण्यात आली. समितीच्या बैठकीत या सारख्या प्रकल्पाची गरज असल्याचे पुढे आले.

या ‘लॅब’मुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास, रुग्णसेवेचा दर्जा वाढविण्यास, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्याचे मनोविकृतीशास्त्र विभागातील शिक्षण व संशोधनास मदत होण्यास तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मनोविकृतीशास्त्र विभागांचे श्रेणीवर्धन होण्यास मदत होणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. त्यानुसार  मनोविकृतीशास्त्र  विषयात पदव्युत्तर शिक्षण (पीजी) असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही ‘लॅब’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

-प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवा

ज्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मनोविकृतीशास्त्र विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु आहे, त्यांच्याकडे आवश्यक जागा, पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ आहे, अशा संस्थामध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यासाठी सरकारकडून १२ अद्यायावत यंत्रसामूग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

 - या आजाराच्या रुग्णांना मिळणार अद्ययावत उपचार

 ‘मेंटल हेल्थ लॅब टर्न की प्रोजेक्ट’मध्ये मेयो, मेडिकलला यंत्रसामूग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.  यात ‘अ‍ॅव्हर्शन थेरपी यंत्र’ाचा मदतीने दारू, धूम्रपान, ड्रग्ज इत्यादी व्यसनी लोकांवर उपचार, ‘मल्टी बिहेवियर थेरपी यंत्र’ाच्या मदतीने  मानसिकदृष्ट्या लैंगिक समस्यावर उपचार, ‘मेमरी ट्रेकिंग यंत्र’ाच्या मदतीने वाढत्या वयामुळे येणारा स्मृतिभ्रंश, अल्झायमर, मेंदूला दुखापतीमुळे वाढलेल्या स्मृतीसंबंधातील समस्यांवर  तर ‘इलेक्ट्रोस्लीप यंत्र’ाच्या मदतीने निद्रानाशावर उपचार करण्यात मदत होणार आहे.

या शिवाय अनेक मानसिक व न्युरोलॉजीकल विकारांवर यंत्राच्या मदतीने उपचार करणे अधिक सोपे होणार आहे.