शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

अब की भी बारी...मुलीच पडल्या भारी ‘

By admin | Updated: May 20, 2014 00:52 IST

सीबीएसई’च्या (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) दहावीच्या निकालात उपराजधानीमध्ये विद्यार्थिनींचाच वरचष्मा कायम असल्याचे दिसून आले. प्रथम क्रमांक जरी

सीबीएसई’ दहावी निकाल : गुणवंतांचा भर वैद्यकीय-अभियांत्रिकीकडेच

नागपूर : ‘सीबीएसई’च्या (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) दहावीच्या निकालात उपराजधानीमध्ये विद्यार्थिनींचाच वरचष्मा कायम असल्याचे दिसून आले. प्रथम क्रमांक जरी सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूलच्या मोझम्मील खलील याने पटकाविला असला तरी, ‘टॉपर्स’मध्ये बहुतांश प्रमाणात विद्यार्थिनीच आहेत. नागपुरात ‘सीबीएसई’ बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला सुमारे सहा हजार विद्यार्थी बसले होते. मोझम्मीलच्या पाठोपाठ त्याच्याच शाळेतील कोमल कुशवाह या विद्यार्थिनीने दुसरा क्रमांक पटकाविला. तर तृतीय क्रमांकावर सौंदर्या जनार्दन (९८.२ टक्के) ही राहिली. नारायणम् विद्यालयाच्या जिज्ञासा बडवाईक या विद्यार्थिनीने ९८ टक्के गुण मिळवीत चौथे स्थान पटकाविले. भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स येथील शिप्रा मुदलियार, सबोरनी कार, ऐश्वर्या डहाके व सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूलची जान्हवी वालदे यांनी पाचवा क्रमांक पटकाविला. त्यांना ९७.८ टक्के गुण मिळाले. भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स येथील विद्यार्थिनी रिशिका दत्ता व प्राची श्रीवास्तव तर निनाद खांडेकर मॉडर्न स्कूल यांनी ९७.६ टक्के गुण मिळवीत संयुक्तपणे सहावा क्रमांक मिळविला आहे. ९७.२ टक्के गुणांसह भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्सच्याच अंजली घोडवैद्य, सुरभी शहलोत व श्रीकृष्णनगर शाखेचा पीयूष अग्रवाल यांनी सातवा क्रमांक मिळविला. उपराजधानीतील ४८ पैकी अनेक शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला असून, सगळीकडेच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. गुणवंतांची पसंती वैद्यकीय-अभियांत्रिकी शाखेला उपराजधानीतून पहिल्या तीन क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश जणांनी वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेलाच पसंती दिली आहे. गेल्या वर्षी गुणवंतानी अभियांत्रिकीला जास्त प्राधान्य दिले होते. (प्रतिनिधी) ‘टॉपर्स टॉक’ ‘आयआयटी’त जाण्यासाठी प्रयत्न : मोझम्मील खलील विद्यार्थ्याला बारावीनंतर देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्था असलेल्या ‘आयआयटी’ येथील अभियांत्रिकीची पदवी घ्यायची आहे. यासाठी मी आतापासूनच प्रयत्नाला लागलो आहे, असे मत ९९ टक्के गुण मिळविणार्‍या मोझम्मील खलील या विद्यार्थ्याने व्यक्त केले. वर्षभर नियमितपणे अभ्यास करीत होतो. वायफळ वेळ वाया जाऊ नये म्हणून वर्षाच्या सुरुवातीलाच सोशल नेटवर्किंगपासूनदेखील दूर झालो, असे त्याने सांगितले. त्याचे वडील रेल्वेत असून आई गृहिणी आहे. मोझम्मीलला वाचनाची प्रचंड आवड असून, चेतन भगत हा आवडता लेखक आहे. मोझम्मीलला इंग्रजी व संस्कृतमध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत, हे विशेष. प्रशासकीय सेवेत जायचे आहे - कोमल कुशवाह साधारणत: विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेचे वेध लागले असतात. परंतु मला मात्र प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा आहे. यासाठी सातत्याने अवांतर वाचनाच्या माध्यमातून सामान्य ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न असतो. दहावीच्या परीक्षेत नियमित अभ्यास व सरावावर भर दिला, असे मत कोमल कुशवाह या विद्यार्थिनीने व्यक्त केले. उपराजधानीतून दुसरे स्थान पटकाविणार्‍या कोमल कुशवाह हिचे वडील विजय कुशवाह हे व्यावसायिक असून, आई गृहिणी आहे.