शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आता म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचाही काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:07 IST

पोलिसांची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेमडेसिवीरनंतर आता म्युकरमायकोसिस आजारावरील इंजेक्शनचाही काळाबाजार सुरू झाला आहे. या आजारात वापरले ...

पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रेमडेसिवीरनंतर आता म्युकरमायकोसिस आजारावरील इंजेक्शनचाही काळाबाजार सुरू झाला आहे. या आजारात वापरले जाणारे टॉसिलीझुंब इंजेक्शन एक लाख रुपयांत विकत असलेले दोन होमिओपॅथी डॉक्टर व त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी रंगेहात पकडले. झोन दोनच्या पथकाने अंबाझरी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच ही कारवाई केली. सचिन अशोक गेवरीकर (वय २०), रा. मोहगाव बालाघाट, विशेष ऊर्फ सोनू जीवनलाल बाकट (२६), परसवाडा, बालाघाट आणि रामफल लोलर वैश्य (२४), रा. सिंगरौली, बालाघाट अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. विशेष आणि रामफल हे होमिओपॅथी डॉक्टर आहेत. म्युकरमायकोसिसच्या काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची ही पहिलीच कारवाई आहे.

कोविडनंतर आता म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्णही मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत. याच्या उपचारासाठी लागणारे औषध आणि इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे याचा काळाबाजार वाढला आहे. रेमडेसिविरप्रमाणे हे इंजेक्शनही मोठ्या किमतीवर विकले जात आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी २२ मे रोजी पार पडलेल्या गुन्हे मीटिंगमध्ये ठाणेदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्युकरमायकोसिस औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, पोलीस लक्ष ठेवून होते. डीसीपी विनिता साहू यांना टॉसिलीझुंब इंजेक्शन एक लाख रुपयांत विकले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. या इंजेक्शनची मूळ किंमत ४०,६०० रुपये आहे. माहिती मिळताच पोलीस सतर्क झाले. पोलिसांना सचिन गेवरीकरकडे इंजेक्शन असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून सचिनशी संपर्क साधला. सचिनने एक लाख रुपये मागितले. सौदा पक्का झाला. सचिनने डमी ग्राहकाला रविनगर चौकाजवळ बोलाविले. तिथे पैसे घेऊन इंजेक्शन देताच पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलिसांनी विचारपूस केली तेव्हा सचिनने इंजेक्शन विशेष ऊर्फ सोनू बाकटकडून मिळाल्याचे सांगितले. पोलिसांना सोनूसोबतच रामफलही सापडला. सोनूने इंजेक्शन रामफलकडून मिळाल्याचे सांगितले. पोलिसांनी रामफललाही ताब्यात घेतले. सोनू व रामफल हे बीएचएमएस आहे. होमिओपॅथीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर दोघेही खासगी रुग्णालयात इंटर्नशिप करतात. डॉक्टर असल्याने सोनू व रामफलचा शासकीय रुग्णालयाशी संपर्क आहे. या संपर्काच्या माध्यमातूनच त्यांनी इंजेक्शन मिळविले. पोलिसांना या संबंधात काही पुरावे सापडले आहेत. त्यामुळे आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. आरोपींना न्यायालयासमोर सादर करीत तीन दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. ही कारवाई डीसीपी विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात पीएसआय कुणाल धुरट, म्हात्रे, रामदास नेरकर, आशिष वानखेडे, संतोष शेंद्रे यांनी केली.

एफडीए - प्रशासनाचे दुर्लक्ष

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यात पोलिसांची महत्त्वाची भूमिका राहिली. एफडीए आणि स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होते. आतासुद्धा तसाच प्रकार पाहायला मिळत आहे. रेमडेसिविरनंतर म्युकरमायकोसिससाठी उपयोगात येणाऱ्या इंजेक्शनचाही काळाबाजार होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु एफडीए व स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा काळाबाजारही उघडकीस आला आहे.