शहरं
Join us  
Trending Stories
1
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
2
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
3
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
4
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
5
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
6
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
7
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
8
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
9
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
10
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
11
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
12
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
13
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
14
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
15
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
17
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
18
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
19
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
20
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन

२४ नोव्हेंबर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृती आयोजन

By admin | Updated: November 19, 2015 01:43 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त

यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायन कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता यवतमाळ येथील बाबूजींचे समाधी स्थळ असलेल्या ‘प्रेरणास्थळा’वर करण्यात आले आहे. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे संगीत, कला, निसर्ग आदींवर निस्सीम प्रेम होते. आयुष्यभर त्यांनी आपले संगीत प्रेम जोपासले. त्यामुळेच दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनाला संगीतमय आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी कौशिकी चक्रवर्ती यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक अजय चक्रवर्ती आणि अंजना चक्रवर्ती यांची कन्या कौशिकी आपल्या असामान्य गायन शैलीने यवतमाळकरांना मंत्रमुग्ध करणार आहे. कौशिकी यांनी वयाच्या ७ व्या वर्षीपासून शास्त्रीय संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. कोलकाता येथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी जोगमायादेवी कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. तत्त्वज्ञान या विषयात प्रथम श्रेणी डिग्री घेतली. त्यानंतर त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनात आपल्या गायकीचा स्वतंत्र ठसा उमटविला. अनेक मोठ्या संगीत समारोहातून कौशिकी यांनी आपल्या गायकीने रसिकांंना मंत्रमुग्ध केले. मुख्यत्वे करून भारतातील आयटीसी संगीत संमेलन, कॅलिफोर्नियाचा स्प्रिंग फेस्टिव्हल आॅफ म्युझिक, लॉसएंजिल्सचा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव या सारखे भव्यदिव्य कार्यक्रमांचा समावेश आहे. कौशिकी चक्रवर्ती यांंना अनेक पुरस्कारही मिळाले आहे. त्यात १९९५ सालचा जाडू भट्ट, २००० साली आऊट स्टॅन्डींग यंगपर्सन, २००५ साली बीबीसी अवार्ड संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांनी अनेक बांगला व हिंदी चित्रपटांसाठी पार्श्व गायनही केले आहे. अशा या शास्त्रीय गायिका आपल्या असामान्य गायन शैलीची जादू यवतमाळकरांवर टाकणार आहे. या शास्त्रीय मैफलीत त्यांना तबल्यावर संदीप घोष साथ देणार असून हार्मोनियमवर अजय जोगळेकर राहणार आहेत. या कार्यक्रमाला यवतमाळकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.