शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील खंडणीबाज कुख्यात शेखू जेरबंद, पिस्तूलही जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 22:52 IST

एका दारू वितरकाचे अपहरण करून त्याला दहा लाखांची खंडणी मागण्याच्या गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात गुंड शेखू खान याला गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दुपारी १२ वाजता सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले.

ठळक मुद्देगुन्हे शाखेने बांधल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका दारू वितरकाचे अपहरण करून त्याला दहा लाखांची खंडणी मागण्याच्या गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात गुंड शेखू खान याला गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दुपारी १२ वाजता सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले. त्याच्याकडून एक पिस्तूलही जप्त करण्यात आले.शहरातील टॉप - १० गुन्हेगारांच्या टोळ्यांच्या म्होरक्यापैकी एक असलेला कुख्यात शेखू थंड डोक्याचा गुन्हेगार मानला जातो. त्याने भाजयुमोचे हेमंत दियेवार यांची वर्दळीच्या शंकरनगर चौकात अनेकांसमोर निर्घृण हत्या केली होती. या हत्याकांडानंतर शेखू प्रकाशझोतात आला होता. या प्रकरणातून सुटका झाल्यानंतर शेखूने आपली टोळी तयार करून शहरात प्रचंड दहशत निर्माण केली. नागपूरसह चंद्रपूर जिल्ह्यातही शेखूच्या टोळीची दहशत आहे. तो कोळसा व्यापाराच्या नावाखाली कोळसा तस्करी करणारे, दारू तस्कर, दारू विक्रेते, अवैध धंदेवाल्यांना मदत करतो आणि त्याबदल्यात त्यांच्याकडून महिन्याला लाखोंची खंडणी वसूल करतो. अशाच एका दारू विक्रेत्याचे अपहरण करून त्याला १० लाखांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात पोलिसांना तो वॉन्टेड होता. गेल्या अनेक दिवसांपासून शेखू पोलिसांसोबत ‘ चुहा बिल्ली’चा खेळ खेळत होता. मांडवली करणाऱ्यांच्या माध्यमातून त्याने पोलिसांकडे सरेंडर करणार, असा मेसेजही पाठविला होता. मात्र, प्रत्यक्षात तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. शुक्रवारी सकाळी तो धरमपेठ परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पथक त्याच्या मागावर होते. दुपारी १२ च्या सुमारास तो साथीदारासह एका वाहनात बसून असल्याचे कळताच पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतली. मात्र, पोलीस जवळ येण्यापूर्वीच शेखूने तेथून धूम ठोकली. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला काही अंतरावर पकडले. त्याच्याकडून एक पिस्तूलही जप्त करण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर त्याची चौकशी सुरू असल्याचे गुन्हे शाखेचे अधिकारी सांगत होते.

स्नेहलची भूमिका महत्त्वाची !कुख्यात शेखूची प्रेयसी स्नेहल सुधीर पीटर हिची शेखूच्या गुन्हेगारीत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. शेखूच्या टोळीतील गुंडांना घर मिळवून देणे, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे, खंडणीची रक्कम जमवून ठेवणे, अशी जबाबदारी ती पार पाडते. तिला न्यायालयीन कस्टडीत पाठविण्यात आले आहे. तर, शेखूसह अन्य एकूण सातजण आता पोलीस कस्टडीत आहेत. शेखूसह त्याच्या टोळीतील बहुतांश खतरनाक गुन्हेगार पकडले गेल्यामुळे त्याच्या टोळीचे नेटवर्क आता कारागृहाच्या भिंतीआड झाले आहे.  पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांच्या नेतृत्वात एपीआय एस. आर. परतेकी, पीएसआय एल. जी. तांबुसकर तसेच पोलीस कर्मचारी सीतानाथ पांडे,  मोहन शाहू, प्रकाश वानखेडे, रामनरेश यादव, अरविंद झिलपे, सतीश पांडे, मंजितसिंग, सतीश पाटील, रविकुमार शाहू, श्याम गोरले, योगेश गुप्ता, सय्यद वाहिद आणि शिपाई अश्विन यांनी ही धाडसी कामगिरी बजावली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक