शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कुख्यात माओवादी प्रशांत राही याला जामीन नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 22:09 IST

बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला कुख्यात माओवादी प्रशांत राही याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा दणका : जन्मठेपेची शिक्षा झालेला आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला कुख्यात माओवादी प्रशांत राही याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.राही हा माओवादी चळवळीचा मास्टरमाईन्ड जी. एन. साईबाबाचा साथिदार आहे. त्याने कारागृहात पसरत असलेल्या कोरोना संक्रमणामुळे शिक्षेवर स्थगिती व जामीन देण्याची विनंती केली होती. परंतु, उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता त्याला दणका दिला. राहीचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मागण्याचा हा तिसरा अर्ज होता. तो डेहराडून (उत्तराखंड) येथील रहिवासी आहे. ७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने राही व इतर काही आरोपींना बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली आहे. आरोपींविरुद्ध दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गंभीर गुन्हे सिद्ध झाले आहेत. राहीने सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. ते अपील अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाने त्या अपीलवर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात अंतिम सुनावणी निश्चित केली आहे. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. प्रशांत सत्यनाथन यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnaxaliteनक्षलवादी