शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कुख्यात क्रिकेट बुकी कुणाल सचदेव विमानतळ परिसरात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2023 21:53 IST

Nagpur News कुख्यात क्रिकेट बुुकी कुणाल सचदेव याला सोनेगाव पोलिसांनी विमानतळाजवळ जेरबंद केले.

नागपूर : कुख्यात क्रिकेट बुुकी कुणाल सचदेव याला सोनेगाव पोलिसांनी विमानतळाजवळ जेरबंद केले. कुणालला अटक झाल्याचे कळाल्याने नागपुरातील लकडगंज, खामला, जरीपटका, तहसील, कोतवाली, अंबाझरी आणि सदर परीसरातील बुकींमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कुणाल सचदेव हा भूमिगत राहून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याची बेटिंग करतो. प्रारंभी कालूच्या मदतीने त्याने क्रिकेट सट्टेबाजीची सुरुवात केली होती. कोट्यवधी रुपये कमविल्यानंतर त्याने आता गोवा, दिल्लीतून आंतरराष्ट्रीय बुकींशी व्यवहार सुरु केल्याची माहिती आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेदरम्यान त्याने देशातील अनेक राज्यातील क्रिकेट बुकींची खायवाडी-लगवाडी करीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली. आज तो नागपूरला परत येणार होता, अशी माहिती सोनेगाव पोलिसांना मिळाली. तो दुपारी विमानतळावर येताच पोलिसांनी सापळा रचला. त्याला विमानतळ परीसरातूनच अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले. डीसीपी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात पोलीस आरोपी सचदेवची चाैकशी करीत होते.

अनेक बाबींचा खुलासा होणाररात्री ९ पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेचे किशोर पर्वते यांनी जामठा क्रिकेट मैदानावरून चार क्रिकेट सट्टेबाजांना अटक केली होती. त्या सट्टेबाजांचासुद्धा संबंध कुणाल सचदेव यांच्याशी संबंध असल्याची चर्चा आहे. सचदेवच्या अटकेच्या संबंधाने वृत्त लिहिस्तोवर अनेक बाबींचा खुलासा झाला नव्हता. चाैकशीत तो होऊ शकेल, असे डीसीपी जैन यांनी सांगितले. 

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीArrestअटक