शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

नवीन न्यायमूर्तींच्या नियुक्तीची अधिसूचना जारी

By admin | Updated: June 1, 2017 02:38 IST

केंद्रीय विधी व न्याय विभागातर्फे आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात १४ नवीन अतिरिक्त न्यायमूर्तींची नियुक्ती

हायकोर्ट : तीन नागपूरकर विधिज्ञांचा समावेश लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय विधी व न्याय विभागातर्फे आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात १४ नवीन अतिरिक्त न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली. नवीन न्यायमूर्तींमध्ये महाधिवक्ता रोहित देव, मुख्य सरकारी वकील भारती डांगरे व सर्वोच्च न्यायालयातील वकील मनीष पितळे या तीन नागपूरकर विधिज्ञांचा समावेश आहे. १४ पैकी ८ न्यायमूर्तींची विविध जिल्ह्यांतील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांमधून तर, ६ न्यायमूर्तींची वकिलांमधून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या शपथविधीची तारीख जाहीर झालेली नाही. उच्च न्यायालयाच्या उन्हाळ्याच्या सुट्या ४ जून रोजी संपत असून, ५ जूनपासून नियमित कामकाजाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वांना येत्या शुक्रवारी म्हणजे, २ जून रोजी शपथ दिली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शपथविधीनंतर नवीन न्यायमूर्तींना मुंबई, औरंगाबाद व नागपूर यापैकी एका ठिकाणी नियुक्ती दिली जाईल. रिक्त पदांची संख्या घटली नवीन अतिरिक्त न्यायमूर्तींच्या नियुक्तीमुळे मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या रिक्त पदांची संख्या घटली आहे. नवीन नियुक्त्यांपूर्वी कायम न्यायमूर्तींची १६ व अतिरिक्त न्यायमूर्तींची १७ अशी एकूण ३३ पदे रिक्त होती. रिक्त पदांची संख्या आता १९ वर आली आहे. आतापर्यंत ५५ कायम व ६ अतिरिक्त न्यायमूर्ती कार्यरत होते. अतिरिक्त न्यायमूर्तींची संख्या वाढून २० झाली आहे. उच्च न्यायालयाला कायम न्यायमूर्तींची ७१ व अतिरिक्त न्यायमूर्तींची २३ अशी एकूण ९४ पदे मंजूर आहेत. अतिरिक्त न्यायमूर्तींची सुरुवातीची दोन वर्षे परीविक्षा काळ असतो. या काळातील कामगिरी लक्षात घेऊन त्यांना न्यायमूर्तिपदी कायम करण्यात येते.