शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

संप दडपण्यासाठी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना नोटीस; जि.प.तील पदाधिकारी संपकर्त्यांच्या पाठिशी

By गणेश हुड | Updated: March 15, 2023 21:37 IST

Nagpur News नागपूर प्रशासनाने संपातील सहभागी कर्मचाऱ्यांना २४ तासात स्पष्टीकरण द्या अशा आशयाची नोटीस बजावली आहे.

गणेश हूड                                                                                                                                                                                  नागपूर :  कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना रद्द करून  जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह अन्य मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, जिल्हा नागपूर यांच्या नेतृत्वात विविध संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे  महापालिका व जिल्हा परिषदेतील कामकाज विस्कळीत झाले आहे. यामुळे प्रशासनाने संपातील सहभागी कर्मचाऱ्यांना २४ तासात स्पष्टीकरण द्या अशा आशयाची नोटीस बजावली आहे.

संप दडपण्यासाठी प्रशासनाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. जिल्हा परिषद मुख्यालयापुढे कर्मचाऱ्यांच्या धरणे मंडपाला जि.प. अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, कृषि व पशुसंवर्धन सभापती प्रवीण जोध, शिक्षण व अर्थ समिती सभापती राजकुमार कुसुंबे, समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे, महिला व बाल कल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे, जि.प. सदस्य संजय जगताप, प्रकाश खापरे, शंकर दडमल भेट देवून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. प्रशासनाने नोटीस बजालेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही याची ग्वाही दिली. 

  आंदोलन प्रसंगी कर्मचाऱ्यांनी "एकच मिशन जुनी पेन्शन" चा नारा बुलंद केला व परिसर दणाणून सोडला. आंदोलनाचे नेतृत्व संजय सिंग, डॉ. सोहन चवरे, संजय धोटे,  अरविंद अंतूरकर, सुदाम पांगुळ, विजय बुरेवार,  गोपीचंद कातुरे,अरविंद मदने,मिथीलेश देशमुख, संजय तांबडे, सुजित अढाऊ, संतोष जगताप, भास्कर झोडे, किशोर भिवगडे, सुभाष पडोळे, जयंत दंढारे, योगेश राठोड, निरंजन पाटील, उमेश जायेभाये, योगेश हरडे, चिंधबा दाढे, संगीता चंद्रिकापुरे, रंजना कांबळे, अलका खंते  आदी कर्मचारी नेत्यांचा सहभाग होता.मनपा कर्मचाऱ्यांनो नोटीसला घाबरु नकामहापालिका प्रशासनाने संपात सहभागी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. वास्तविक राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी शासनाला संपाची रितसर नोटीस दिली आहे. तसेच  राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाॉईज असोसिएशन (इंटक) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला संपाबाबत आधिच् नोटीस बजावली आहे. त्यामुळे नोटीसला घाबरू नका,  असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी हा संप असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Strikeसंप