शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील लता मंगेशकर रुग्णालयाला नोटीस राजकीय वैमनस्यातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 23:56 IST

विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे एन.के.पी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र, लता मंगेशकर रुग्णालय येथील जागेचा व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून व्हीएसपीएम अ‍ॅकॅडमी आॅफ हायर एज्युकेशन यांना बजावण्यात आलेली नोटीस सकृतदर्शनी राजकीय हेतूने प्रेरित आहे. राजकीय वैमनस्यापोटी एका चांगल्या संस्थेला अडचणीत आणण्याचा डाव यामागे असल्याचा आरोप संस्थेचे संचालक दिलीप भागडे यांनी केला.

ठळक मुद्देसंचालक भागडे : चांगल्या संस्थेला अडचणीत आणण्याचा डाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे एन.के.पी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र, लता मंगेशकर रुग्णालय येथील जागेचा व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून व्हीएसपीएम अ‍ॅकॅडमी आॅफ हायर एज्युकेशन यांना बजावण्यात आलेली नोटीस सकृतदर्शनी राजकीय हेतूने प्रेरित आहे. राजकीय वैमनस्यापोटी एका चांगल्या संस्थेला अडचणीत आणण्याचा डाव यामागे असल्याचा आरोप संस्थेचे संचालक दिलीप भागडे यांनी केला.भागडे यांनी सांगितले, १९९० ला शासनाकडून २७.३ हेक्टर जागा रुग्णालयासाठी लीजवर मिळाली होती. संस्थेमार्फत गोरगरिबांना अत्यंत माफक शुल्कात दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरविण्यात येते. शासनाच्या निकषानुसार १५ टक्के जागेचा व्यावसायिक वापर करता येत असून आम्ही फक्त दोन टक्केच वापर केला आहे. येथे ३६ गाळे तयार करण्यात आले होते. वर्ष २०१४-१५ ला हे बांधकाम करण्यात आले. यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी घेण्यात आली आहे. जागेचा गैरवापर केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून आधीच नोटीस मिळाली आहे. त्या आधारे सर्व दुकाने रद्द करून धर्मशाळा सुरू करण्यात आली. रुग्णांसोबत येणाऱ्या  नातेवाईकांच्या राहण्याची व्यवस्था येथे होते. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या नोटीसवर उत्तरही देण्यात आले. हे प्रकरण जिल्हाधिकारी यांच्याकडेच प्रलंबित आहे. आमच्या उत्तरावर निर्णय न घेता नव्याने नोटीस देण्यात आली. मुळात ही नोटीस नाहीच ते केवळ पत्र आहे. पण त्यांनी पाठवलेले हे पत्रही चुकीचे आहे, असे भागडे म्हणाले. या सुडबुद्धीच्या कारवाईविरुद्ध न्यायालयाची दारे ठोठावण्याचा पर्याय संस्थेने खुला ठेवला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी संस्थेचे संचालक भाऊसाहेब भोगे, एन.के. नटराजन, अधिष्ठाता डॉ. काजल मित्रा उपस्थित होते.डिमांड आल्यास भाडे भरण्यास तयारगाळे बांधकाम करताना शासनाची मंजुरी घेतली नाही, अशी कबुली त्यांनी दिली. परंतु शासनाची परवानगी घेतलीच पाहिजे, असा नियम नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सोबतच गाळे बांधकाम केल्याचा किराया भरला नसल्याचे त्यांनी मान्य करीत प्रशासनाकडून डिमांड आल्यास भरण्यात येईल, असेही भागडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलLata Mangeshkarलता मंगेशकर