शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मिहान-सेझमध्ये बांधकाम न करणाऱ्या १४ कंपन्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:29 IST

उद्योगाला गती देण्याच्या उद्देशाने मिहान-सेझमध्ये जागा विकत घेऊन अद्याप बांधकाम सुरू न केलेल्या कंपन्यांना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आतापर्यंत १४ कंपन्यांना नोटिसा दिल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देकंपन्यांनी प्रकल्पातील ३२६ एकर जागा अडवलीमहाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या वतीने कारवाई

आॅनलाईन लोकमतनागपूर : उद्योगाला गती देण्याच्या उद्देशाने मिहान-सेझमध्ये जागा विकत घेऊन अद्याप बांधकाम सुरू न केलेल्या कंपन्यांना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आतापर्यंत १४ कंपन्यांना नोटिसा दिल्याची माहिती आहे. बांधकाम केव्हा सुरू करणार आणि कालबद्ध नियोजन कंपन्यांना देण्यास सांगण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नोटिसाच्या माध्यमातून कंपन्यांना आठवण करून देण्यात येत आहे. प्रतिनिधींसोबत संवाद साधून उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम आहे.एमएडीसीकडून बड्या कंपन्यांना अभयमिहान-सेझमध्ये अर्धवट काम करून पुढे काहीही विकास न केलेल्या १३ कंपन्यांनी प्रकल्पातील ३२६ एकर जागा अडवून ठेवली आहे. विशेष म्हणजे, जागा घेऊन आणि करार करूनही काम सुरू न केलेल्या २३ कंपन्यांपैकी एकाही कंपनीला एमएडीसीने नोटीस पाठवलेली नाही. एकीकडे मोठ्या कंपन्यांना सोडून लहान कंपन्यांनाच एमएडीसीने नोटिसा बजावल्या आहेत. ३२६ एकर जागा अडविणाऱ्या १३ कंपन्यांवर एमएडीसी मेहरबान असल्याचा संदेश उद्योजकांमध्ये जात आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिहान-सेझमध्ये ६६ हून अधिक कंपन्यांनी जागा घेऊन त्यातील केवळ १२ कंपन्यांचे काम सुरू आहे. जमिनीचा ताबा, मंजूर आराखडा आणि अर्धवट बांधकामाच्या आधारावर एमएडीसीने कंपन्यांना विविध पातळीवर विभागले आहे. या श्रेणीत १३ मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्या संपूर्ण जागेचा उपयोग केव्हा करणार, हा गंभीर प्रश्न आहे. यापूर्वीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिहान-सेझमध्ये जागा विकत घेतलेल्या कंपन्यांनी उद्योग सुरू करावेत म्हणून बैठका घेतल्या आहेत. याशिवाय कडक कारवाई करून कंपन्यांना नोटिसा दिल्या होत्या. जागतिक मंदीमुळे सध्या उद्योग सुरू करणे शक्य नसल्याचे उत्तर बहुतांश कंपन्यांनी दिले होते. पुन्हा नोटिसा दिल्यानंतर कंपन्या काय उत्तर देतात, याकडे लक्ष आहे.नोटीस नव्हे कंपन्यांना स्मरणपत्रमिहान-सेझमध्ये जागा घेऊन काम सुरू न केलेल्या कंपन्यांना प्लॅन द्या आणि बांधकाम केव्हा सुरू करणार याचा कालबद्ध कार्यक्रम आणि तंतोतंत माहितीची विचारणा करणाऱ्या नोटिसा देऊन १५ दिवसात उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. ही एक नोटीस प्रक्रिया नसून कंपन्यांसाठी स्मरणपत्र आहे. मिहानमध्ये औद्योगिक विकास साधण्याचा उद्देश आहे. कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधणार आहे.सुरेश काकाणीउपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी.

टॅग्स :Airportविमानतळ