शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

नोटांचाही भार झाला फाटक्या झोळीस माझ्या!

By admin | Updated: November 17, 2016 03:00 IST

अनवाणी पायांनी उपाशीपोटी दिवसभर शहर पालथे घातल्यावर पाच-पंचवीस रुपये गोळा व्हायचे.

भिकाऱ्यांची व्यथा : दुकानदारांना चिल्लर देऊन घेतलेली पाचशेची नोट चालवायची कुठे?शफी पठाण : नागपूर अनवाणी पायांनी उपाशीपोटी दिवसभर शहर पालथे घातल्यावर पाच-पंचवीस रुपये गोळा व्हायचे. त्यातील पोटापुरते खर्च करून बाकीचे फाटक्या झोळीत बांधून ठेवायचे. पण, भिंतीच नसलेल्या घरात आभाळ पांघरून झोपणाऱ्या या दुर्दैवी जीवांना इतके चिल्लर पैसे सुरक्षित सांभाळणे कठीण व्हायचे अन् ते एखाद्या दुकानदाराला सोेपवून बंदी नोट घ्यायचे. यातूनच अनेक भिकाऱ्यांकडे पाचशेच्या नोटा गोळा झाल्या. पण, मायबाप सरकारच्या एका निर्णयाने या नोटांचे केवळ वैधत्वच संपवले नाही तर पै-पै जोडून आयुष्य कंठणाऱ्या भिकाऱ्यांनाही नव्याने भिकेला लावले आहे. भीक मागण्यावाचून निर्वाहाचा दुसरा पर्याय नाही आणि पर्यायाने इतर लोक उदार झाल्याखेरीज ज्याचं उदरभरण होणार नाही असा हा समाजाच्या लेखी सर्वात शेवटचा व कायम दुर्लक्षित घटक़ पण, याच दुर्लक्षित घटकाचा कालपर्यंत व्यावसायिकांना मोठा फायदा व्हायचा. सुट्या पैशांची बाजारात सदैव चणचण असते. अशा स्थितीत हेच भिकारी कामी यायचे. त्यांच्याकडचे सुटे पैसे ते दुकानदारांना देऊन बंदी नोट घ्यायचे. यातून शहरातील अनेक भिकाऱ्यांकडे पाचशेच्या नोटा गोळा झाल्या. परंतु आता हजार, पाचशेच्या नोटाच रद्द झाल्याने या भिकाऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. या नोटा बदलून मिळणार आहेत. परंतु त्यासाठी बँक खाते, ओळखपत्र आवश्यक आहे. येथे स्वत:चे नाव ज्यांना नीट आठवत नाही त्यांच्याकडे ओळखपत्र येणार तरी कुठून? लोकमतने शहरात फिरून इतरांच्या उदारतेवर जगणाऱ्या या लोकांचा आढावा घेतला तेव्हा ही विदारक स्थिती समोर आली. आयुष्य तर सारेच अधांतरी आहे. पण, दुर्दैवाने एखादे मोठे संकट कोसळलेच तर गाठीशी चार पैसे असावे म्हणून केलेली ही भविष्याची तरतूद एका रात्रीतून निव्वळ कचरा ठरली आहे. कुणाला सांगता येत नाही, सांगितले तरी कुणी ऐकणारे नाही...अशा विषण्ण अस्वस्थेत भिकाऱ्यांची ही जमात किंमतच गमावलेला नोटांचा हा ऐवज छातीशी कवटाळून नुसती रडत आहे. पण, इथे अवघे शहरच नोटा बदलण्यासाठी सलग धावत असताना कोपऱ्यातल्या या दुर्दैवी जीवांकडे पाहील तरी कोण हा खरा प्रश्न आहे.असे काहुन बदल्ले लोकं?टीबी वॉर्ड चौकात एका प्रेसवाल्याकडे चिल्लर देऊन बंदी नोट घ्यायला आलेली कुसुम आजी म्हणाली, पन्नास, शंभरचे चिल्लर बदलून नोट देत आहेत. पण, आता मोठ्या नोटेले किंमतच नाही म्हणतात. मंग अशी मोठी नोट फेकून द्याची का, असे काहुन लोकं बदल्ले बाप्पा, असा तिचा भाबळा सवाल होता. आभाळच कोसळलेकाही दिवसाआधीच चिल्लर बदलून दोन पाचशेच्या नोटा मिळवल्या होत्या. तेवढीच माझी संपत्ती आहे. पण, आता त्याही नोटा चालत नाहीत म्हणतात. हे ऐकून आभाळच कोसळले आहे. शरीर थकले, आयुष्य कधी दगा देईल सांगता येत नाही. पुन्हा इतके पैसे मिळवणे कठीण आहे, हे हताश शब्द आहेत यशवंत स्टेडियमखाली झोपणाऱ्या दुर्गाप्रसादचे.