पाच लाखांच्या बनावट नोटा जप्तनागपूर : रेल्वेस्थानकावरून चंद्रपूरला जाण्याच्या तयारीत असलेल्या या दोघांना एटीएसने जेरबंद केले. त्यांच्या जवळच्या बॅगची तपासणी केली असता त्यात हजार आणि पाचशेंच्या कोऱ्या करकरीत नोटा आढळल्या. पाच लाखांच्या या नोटांसह गफ्फार आणि सत्तारला ताब्यात घेऊन एटीएसच्या पथकाने कार्यालयात आणले. येथे त्यांची कसून चौकशी करण्यात आली. या नोटांची खेप आपण चंद्रपूर जिल्ह्यात चलनात आणण्यासाठी नेत असल्याचे या दोघांनी सांगितले. (प्रतिनिधी)महिनाभरात दुसरी कारवाईमहिनाभराच्या कालावधीत अशा प्रकारची एटीएसने बजावलेली ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी कोलकात्याच्या आरोपींना पकडून एटीएसने त्यांच्याकडून ९ लाख रुपये जप्त केले होते. त्यावेळी आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारावरून गफ्फार आणि सत्तारसुद्धा या गोरखधंद्यात सहभागी असल्याचा धागा मिळाला होता. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत या दोघांवर एटीएसने ‘आॅनलाईन‘ नजर ठेवल्यानेच ते बनावट नोटांसह हाती लागले.
नोटा चलनात आणण्यासाठीच!
By admin | Updated: November 19, 2015 03:33 IST