शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नाचे स्रोत नाही, खर्चाचा ‘प्लान’ तयार

By admin | Updated: September 7, 2015 02:48 IST

एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न जेवढे असेल त्यानुसारच ती खर्च करते. मात्र, नागपूर महापालिका ही एक अशी संस्था आहे की जिने उत्पन्नाकडे लक्ष न देता दुप्पट खर्चाचा प्लान तयार केला आहे.

मनपा आर्थिक संकटात : पगार देणे कठीण पण योजनांचे स्वप्न राजीव सिंह  नागपूरएखाद्या व्यक्तीचे उत्पन्न जेवढे असेल त्यानुसारच ती खर्च करते. मात्र, नागपूर महापालिका ही एक अशी संस्था आहे की जिने उत्पन्नाकडे लक्ष न देता दुप्पट खर्चाचा प्लान तयार केला आहे. उत्पन्नाचे स्रोत हळूहळू मर्यादित होत चालले आहेत. असे असतानाही खर्चाचे प्लानिंग करण्यापासून मागे हटायला महापालिका तयार नाही. ‘आमदानी अठन्नी, खर्चा रुपय्या’ ही म्हण महापालिकेला तंतोतंत लागू पडत आहे.सद्यस्थिीत महापालिकेचा दरमहा आस्थापना खर्च ६५ कोटी रुपये आहे. १२ महिन्याच्या आधारावर ७८० कोटी रुपये खर्चासाठी आवश्यक आहेत. २०१४-१५ मध्ये महापालिकेला ९७५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. असे असतानाही २०१५-१६ साठी स्थायी समितीने १९४६.१६ कोटी रुपयांचे बजेट तयार केले आहे. १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्यात आला आहे. याचा महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. एलबीटीच्या बदल्यात राज्य सरकारतर्फे महापालिकेला दरमहा ३१ कोटी रुपयांचे अनुदान मिळत आहे, जेव्हा की दरमहा ६० कोटी रुपये अनुदान द्यावे, अशी महापालिकेची मागणी होती. एलबीटी रद्द झाल्यानंतर मालमत्ता कर हाच महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. गेल्या वर्षात मालमत्ता करापासून मनपाला २१० कोटी मिळाले होत. पाणी करापासून ९० कोटीचे उत्पन्न प्राप्त झाले होते. परंतु ओसीडब्ल्यू व कच्च्या पाण्यावर मनपाला त्याहून अधिक खर्च करावा लागला. नगररचना विभागाला १५० कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते परंतु ७५ कोटीचे उत्पन्न मिळाले. यंदाच्या वर्षातही या विभागाला १४४ कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. एलबीटीपासून गेल्या वर्षात ४५० कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट होते. परंतु आॅगस्ट महिन्यात एलबीटी रद्द करण्यात आला. एप्रिल ते जुलै दरम्यान एलबीटीपासून १२० कोटी मनपा तिजोरीत जमा झाले. अनुदान स्वरुपात दर महिन्याला सरकारकडून ३१ कोटी मिळत आहे. त्यात कपातीची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारकडून ३१ कोटी अनुदान मिळत आहे. संपत्ती कराच्या वसुलीवर अधिक भर दिल्याने दर महिन्याला २० ते २२ कोटी मिळत आहे. त्यानंतरही दर महिन्याला १२ ते १४ कोटी कमी पडत आहे. इतर विभागाकडुन अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे.