शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मंजूर आराखड्याशिवाय विक्रीपत्र नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 10:36 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ले-आऊटचा मंजूर आराखडा पडताळल्याशिवाय यापुढे कोणत्याही भूखंडाचे विक्रीपत्र करून देऊ नका, असा आदेश राज्य सरकारला दिला.

ठळक मुद्देसार्वजनिक भूखंडांची अवैध विक्री थांबणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ले-आऊटमध्ये सार्वजनिक उपयोगासाठी आरक्षित जमिनीवर भूखंड पाडून ते अवैधरीत्या विकल्या जातात. हा गैरप्रकार थांबविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ले-आऊटचा मंजूर आराखडा पडताळल्याशिवाय यापुढे कोणत्याही भूखंडाचे विक्रीपत्र करून देऊ नका, असा आदेश राज्य सरकारला दिला.भूमाफिया ले-आऊटच्या कायद्यानुसार आराखडा तयार करून तो सक्षम प्राधिकरणाकडून मंजूर करून घेतात. ले-आऊटमध्ये सार्वजनिक उपयोगासाठी विशिष्ट जमीन आरक्षित ठेवली जाते. परंतु, नियमित भूखंड विकल्यानंतर भूमाफिया आरक्षित जमिनीकडे वळतात व त्या जमिनीवर अवैधरीत्या भूखंड पाडून त्यांची विक्री करतात. अशाप्रकारे फसविल्या गेलेल्या कैलाससिंग चव्हाण व इतर नागरिकांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्यांच्या डेव्हलपरने ले-आऊटमधील सार्वजनिक जमिनीवर १४ भूखंड पाडून ते इतरांना विकले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने या मुद्यावर व्यापक भूमिका घेऊन ले-आऊटचा मंजूर आराखडा पडताळल्याशिवाय यापुढे कोणत्याही भूखंडाचे विक्रीपत्र करून देण्यास मनाई केली. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.

नासुप्र बॅकफूटवर१२ आॅक्टोबर २०१८ रोजी नागपूर सुधार प्रन्यासने मौजा जयताळा येथील एका भूखंडामधून जाणारा पोच रस्ता रद्द केला होता. त्यावरून न्यायालयाने गेल्या तारखेला नासुप्रची कानउघाडणी केली होती. त्यामुळे नासुप्रने बॅकफूटवर जाऊन पोच रस्ता रद्द करण्याचा निर्णय २९ आॅक्टोबर रोजी मागे घेतला. ही माहिती बुधवारी न्यायालयाला देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने यावर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश नासुप्रला दिला.

नियमितीकरण शुल्काचे स्वतंत्र खातेअनधिकृत भूखंड नियमित करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासकडून विशिष्ट शुल्क आकारले जाते. त्या शुल्काचे स्वतंत्र खाते तयार करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने नासुप्रला दिला.

वाढीव एफएसआयची माहिती द्यानासुप्र व महापालिका वाढीव एफएसआय देत असते. त्यामुळे शहरात विविध समस्या निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने दोन्ही प्राधिकरणांना वाढीव एफएसआयची माहिती सादर करण्याचे निर्देश दिलेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय