शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण नव्हे विकासकारण करू! गडकरींचे भावनिक आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 20:42 IST

कुठल्याही निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय होतात. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. परंतु निवडणूक संपली की हे सर्व राजकीय मतभेद आपण विसरणे गरजेचे असते. आता निवडणूक संपली आहे. तेव्हा केवळ भाजपच नव्हे तर विविध राजकीय पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नागपूरच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे. केवळ करायचे म्हणून राजकारण करण्यापेक्षा, जनतेच्या प्रगतीसाठी विकासकारण करू या, असे भावनिक आवाहन नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे विजयी उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. गडकरी यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रात्री त्यांनी ‘लोकमत’ला खास मुलाखत दिली.

ठळक मुद्देनागपूरकरांचे मानले आभार

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : कुठल्याही निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय होतात. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. परंतु निवडणूक संपली की हे सर्व राजकीय मतभेद आपण विसरणे गरजेचे असते. आता निवडणूक संपली आहे. तेव्हा केवळ भाजपच नव्हे तर विविध राजकीय पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नागपूरच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे. केवळ करायचे म्हणून राजकारण करण्यापेक्षा, जनतेच्या प्रगतीसाठी विकासकारण करू या, असे भावनिक आवाहन नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे विजयी उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. गडकरी यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रात्री त्यांनी ‘लोकमत’ला खास मुलाखत दिली.माझ्या प्रामाणिक भावनेचा जनतेने सन्मान केलालोकांची कामे करताना मी कधीही पक्षअभिनिवेष ठेवला नाही. जातीधर्माचा विचार केला नाही. आपल्याकडे कामे घेऊन येणारी प्रत्येक व्यक्ती ही सर्वप्रथम या देशाची नागरिक आहे, नंतर ती कुठल्या तरी पक्षाचा कार्यकर्ता आहे, ही प्रामाणिक भावना ठेवून लोकांची मी कामे केली. त्याचेच फळ म्हणून नागपूरकरांनी माझ्या झोळीत मतांचे दान टाकले. पुढील काळात अधिक लोकाभिमुख वागण्याची जबाबदारी नागरिकांनी माझ्यावर टाकली आहे.नागपूरचा नावलौकिक वाढविण्यास कटिबद्धमागील पाच वर्षांत नागपूरचा वेगाने विकास झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी, आम्ही दोघांनीही नागपूर व विदर्भाच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. पुढील पाच वर्षात नागपूरचा जगात नावलौकिक कसा वाढेल या दृष्टीने आमचे सर्वांचेच प्रयत्न राहतील. भविष्यातील नागपूर हे एक जागतिक दर्जाचे शहर असेल आणि देशात विकासाचा एक आदर्श राज्याची उपराजधानी प्रस्थापित करेल. जनतेने मला साथ दिली व त्यामुळेच विकास करण्याची संधी मला प्राप्त झाली.रोजगार निर्मितीवर राहणार भरनागपुरात जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यावर भर राहणार आहे. नागपूर ‘मेट्रो’ला सुरुवात झाल्याने शहराचा दर्जा वाढला आहे. शहरात दर्जेदार राष्ट्रीय शैक्षणिक संस्था आल्या आहेत. ‘इन्फोसिस’, ‘टीसीएस’, ‘एचसीएल’ यांच्यासह विविध ‘आयटी’ कंपन्यांचे ‘मिहान’मध्ये काम सुरू झाले आहे. उद्योगधंद्यांना आवश्यक असे पोषक वातावरण येथे तयार झाले आहे. जागतिक पातळीवरील अनेक मोठ्या कंपन्यांची नागपूरकडे नजर आहे व भविष्यात नागपुरातील गुंतवणूक नक्कीच वाढेल.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीinterviewमुलाखत