शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारीच नाहीत; कसे राहणार शहर स्वच्छ

By admin | Updated: May 14, 2017 02:29 IST

देशभरातील स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूरला १३७ वा क्रमांक मिळाला आहे. गुण देण्यासाठी कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट,

निम्मी पदे रिक्त : सहा अधिकाऱ्यांचा एकावर भार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशभरातील स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूरला १३७ वा क्रमांक मिळाला आहे. गुण देण्यासाठी कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट, शौचालयांची सुविधा, सांडपाण्यावर प्रक्रिया, नागरिकांचा स्वच्छता अ‍ॅपला प्रतिसाद अशा विविध घटकांचा अभ्यास करण्यात आला. परंतु महापालिकेच्या आरोग्य विभागात (स्वच्छता) मनुष्यबळाचा अभाव आहे. १९८ मंजूर पदांपैकी तब्बल १०१ पदे रिक्त आहेत. यात आरोग्य विभागाच्या झोन अधिकाऱ्यांच्या सहापैकी पाच पदे रिक्त आहेत. अधिकारीच नाही तर शहर कसे स्वच्छ होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातून दररोज १००० ते ११०० मेट्रिक टन कचरा निघतो. कचरा संकलन व त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असलेल्या विभागात अर्ध्याहून अधिक पदे रिक्त आहेत. यात स्वच्छता अधीक्षक, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ आरोग्य निरीक्षक व जमादार आदींचा समावेश आहे. अधिकारी व कर्मचारीच नसतील तर स्वच्छतेचे काम सक्षमपणे कसे होणार,असा प्रश्न आहे. झोनमधील स्वच्छता यंत्रणा राबविण्याची जबाबदारी झोनल अधिकारी व स्वच्छता अधीक्षकांवर असते. परंतु झोन अधिकारी व अधीक्षकांच्या १३ मंजूर पदांपैकी ८ पदे रिक्त रिक्त आहेत. सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेची कामे करून घेण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षक व जमादार यांच्याकडे असते. परंतु ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. याचा परिणाम शहरातील स्वच्छतेवर झाला आहे. स्वच्छ व सुंदर नागपूर कसे होणार स्वच्छ व सुंदर नागपूर असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जातो. परंतु विभागात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसताना आरोग्य विभागाच्या योजना सक्षमपणे राबविणे शक्य नाही. याचा परिणाम वैयक्तिक शौचालय योजनेवर झाला आहे. २०१६-१७ या वर्षात विभागाला ११ हजार शौचालयाचे उद्दिष्ट दिले असताना ७ हजार लाभार्थ्यांनाच याचा लाभ मिळाला आहे. लोकसंख्येनुसार मनुष्यबळाची गरज वाढत्या लोकसंख्येसोबतच आरोग्य विभाग सक्षम करण्याची गरज आहे. यासाठी विभागाचा नवीन आकृतिबंध लागू करण्याची गरज आहे. परंतु विभागात जुन्या आकृतिबंधातील निम्मी पदे रिक्त आहेत. तीच भरली जात नसेल तर नवीन आकृतिबंध लागू कधी करणार, असा प्रश्न आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता तूर्त यावर निर्णय होण्याची शक्यता नाही.