कॉफी विथ स्टुडंटस्’नंतर चर्चेला फुटले पेवनागपूर : वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग (डीएमईआर) जबाबदारीच स्वीकारत नसेल तर मेयो, मेडिकलच्या समस्या कशा सुटतील, असा प्रश्न वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ‘कॉफी विथ स्टुडंटस्’नंतर चर्चेला आला आहे. विशेष म्हणजे, डीएमईआरकडे या दोन्ही रुग्णालयाच्या विकासात्मक कामांचा कोट्यवधींचा प्रस्ताव मागील अनेक महिन्यांपासून धूळखात पडला आहे. परंतु हे कार्यालय अनास्था दाखवत असल्याने अनेक महत्त्वाची कामे प्रलंबित आहेत.‘कॉफी विथ स्टुडंटस्’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तक्रारींचा पाऊस पाडला. यात प्रामुख्याने होस्टेलमध्ये स्वच्छता होत नाही, सिवर व ड्रेनेज लाईन बुजलेल्या आहेत, यामुळे टॉयलेट, बाथरूम अस्वच्छ असतात, पाण्याची मुबलक सोय आदी तक्रारी होत्या. याला घेऊन आव्हाड यांनी मेयो, मेडिकल आणि दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना धारेवर धरले. इतक्या प्राथमिक पातळीच्या पायाभूत सुविधा नसतील असे वाटले नव्हते. हे धक्कादायक आहे, असे म्हणत वारंवार आश्चर्य व्यक्त केले. परंतु खरी बाब म्हणजे, रुग्णालय प्रशासनाने वारंवार या संदर्भातील प्रस्ताव डीएमईआरकडे पाठविले. परंतु डीएमईआरची अनास्था आणि लालफितीच्या मनमानीमुळे या सारखे अनेक कोट्यवधींचे प्रस्ताव पडून आहेत. (प्रतिनिधी)
अधिष्ठाता नव्हे, ‘डीएमईआर’ची अनास्था
By admin | Updated: June 30, 2014 00:40 IST