शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

उत्तरेत दाणादाण

By admin | Updated: August 14, 2015 03:11 IST

उत्तर नागपुरातील समतानगर भागातील अनेक झोपड्यांत पाणी शिरले, तर असंख्य झोपड्या वाहून गेल्या.

समतानगरातील झोपड्या गेल्या वाहूननागपूर : उत्तर नागपुरातील समतानगर भागातील अनेक झोपड्यांत पाणी शिरले, तर असंख्य झोपड्या वाहून गेल्या. घटनेची माहिती मिळताच सुगतनगर फायर स्टेशनच्या तीन गाड्या पोहोचल्या. यातील काही अग्निशमन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी समतानगरातील वसंता भोयर, त्यांची पत्नी आणि मुलगी हे घरात अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू आॅपरेशन राबवावे लागले. याशिवाय दुर्गादेवी मंदिर, राहुल बोधी बुद्धविहारात पाणी शिरले होते. अग्निशमन विभागाने आणलेली बोट बंद पडल्यामुळे नागरिकांनी हाताने पकडून ही बोट बाहेर काढली. याशिवाय समतानगर भागातील रस्ते, पूल, घर, दुकाने सर्वच पाण्यात बुडून गेली होती.कस्तुरबानगरात आजी-नातू पुरात वाहून गेलेमुसळधार पावसामुळे उत्तर नागपुरातील कस्तुरबानगरात दोघांचा बळी गेला आहे. घरात झोपले असताना नाल्याला आलेल्या पुराने दोघेही वाहून गेले. आजीचा मृतदेह नारा पुलाजवळ परिसरात सापडला असून, नातू अद्यापही बेपत्ता आहे. जरीपटका, कस्तुरबानगर गल्ली नंबर ५ येथे अनंतराव नेवारे हे राजू भोंगाडे यांच्या घरी किरायाने राहतात. राजू भोंगाडे यांनी नाल्यावर घर बांधले आहे. गुरुवारी सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आला. सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अनंतराव नेवारे यांच्या पत्नी रेखा नेवारे (५०) व त्यांचा नातू यश अंबारे (३) हे घरात पलंगावर बसले होते. नाल्याला पूर आल्यामुळे त्यांच्या घराची भिंत कोसळली आणि हे तिघेही वाहून गेले. यातील अनंतराव यांना एका कोसळलेल्या झाडाचा आसरा मिळाल्याने त्यांना वाचविण्यात नागरिकांना यश आले तर त्यांच्या पत्नी रेखा नेवारे आणि नातू यश अंबारे हे दोघेही पुरात वाहून गेले. रेखाचा मृतदेह नारा पुलाजवळ आढळला, मात्र यश अद्यापही बेपत्ता आहे. कस्तुरबानगरात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. अग्निशमन विभागाचे पथक त्याचा शोध घेत आहे. घरी जाण्यासाठी नव्हता रस्ताउत्तर नागपुरातील संघर्षनगर आणि यशोधरानगर परिसरात जाणाऱ्या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना घराकडे जाण्यासाठी रस्ता उरला नव्हता. अनेक दुचाकी चालकांनी हिंमत करून आपल्या दुचाकी या रस्त्यावरील पाण्यातून काढल्या तर अनेकांनी ‘रिस्क’ नको म्हणून पाणी कमी होण्याची वाट पाहिली.तीन वर्षांपासून नाले सफाई नाहीउत्तर नागपुरात मोठ्या नाल्यांची मनपाने पावसाळ्यापूर्वी सफाई केली असली तरी, लहान नाल्यांच्या सफाईसाठी मनपाकडे यंत्रणाच नाही. त्यामुळे लहान नाले साफ होऊ शकले नाही. अनेक नाल्यांना भिंती नसल्याने थोडा जरी पाऊ स आल्यास नाल्याचे पाणी लोकांच्या घरात शिरते. गुरुवारी तर कहरच झाला. नाले पावसामुळे ओव्हरफ्लो झाले. नारा परिसरात स्कूल बस फसलीमुसळधार पावसामुळे उत्तर नागपुरातील नारा परिसरातील एका शाळेच्या स्कूलबस फसल्या होत्या. पाऊस एवढा झाला की उभ्या बसमध्ये पाऊस शिरला होता. नारा पुल पाण्याखाली आल्याने सकाळी शाळेतून घराकडे निघणारे विद्यार्थी पुलाचे पाणी कमी होण्याची वाट बघत होते. पुलाच्या एका बाजूला स्कूलबस पाणी कमी होण्याची वाट बघत होती. मात्र पाण्याचा जोर वाढल्याने स्कूलबसमध्ये पाणी शिरले. त्यामुळे विद्यार्थी घाबरले होते. परिसरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढले.