शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

उत्तर नागपुरात गँगवार

By admin | Updated: April 1, 2015 02:22 IST

पाटणकर चौकात मंगळवारी भरदिवसा झालेल्या गोळीबाराने अख्खे उत्तर नागपूर थरारले.

नागपूर : पाटणकर चौकात मंगळवारी भरदिवसा झालेल्या गोळीबाराने अख्खे उत्तर नागपूर थरारले. वर्चस्वाच्या लढाईतून लिटील सरदार गँगने गोल्डी सरदार गँगवर अगदी सिनेमा स्टाईल फायरिंग केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच जरीपटका पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलीस व सहपोलीस आयुक्त अनुपकुमारसिंग घटनास्थळी पोहचले. परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. यासंदर्भात जरीपटका पोलीस ठाण्यात गोल्डी भुल्लर याने आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलीस सूत्रानुसार गोल्डी भुल्लर व त्याचे सहकारी युवराज हरदीप सिंह, पिंटू भुल्लर, नवज्योत अटवाल, जोरी ऊर्फ झुल्लर सिंह ढिल्लो मंगळवारी दुपारी जसवंत आयनॉक्समध्ये सिनेमा बघण्यासाठी गेले होते. गोल्डी गाडी पार्क करून मोबाईलशी खेळत होता तर इतर सहकारी तिकीट काढण्यासाठी गेले होते. याच दरम्यान लिटील सरदार चा साळा मोनू सिंह थिएटरच्या पायऱ्या चढत होता. दरम्यान गोल्डीच्या सहकाऱ्यांचा मोनूला धक्का लागला. त्यातून मोनू व गोल्डीच्या सहकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली. बाचाबाचीतून हाणामारी सुरू झाली. त्यानंतर मोनूने आपला जावई लिटील सरदार याला फोन करून बोलावून घेतले. तेव्हा लिटील सरदार काही क्षणातच कारने तिथे पोहचला. दुसऱ्या कारमध्ये बॉडीगार्ड ऊर्फ सत्तू सरदार, बिट्टू भाटिया, राजू टांक व अन्य सहकारी तेथे आले. यासर्वांनी शस्त्र घेऊन गोल्डी गँगवर हल्ला केला. तोच गोल्डी गँगने आपल्या सहकाऱ्यांना घेऊन पळ काढला. लिटील सरदारनेही त्यांचा कारने पाठलाग केला. दरम्यान लिटील सरदारच्या गँगने धावत्या कारमधून गोल्डीच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार केला. सुदैवाने गोळी कुणाला लागली नाही. मात्र गोळीचा आवाज ऐकून एमटी विभागातील पोलीस धावत बाहेर पडले. पोलिसांना बघून लिटीलच्या टोळीने तेथून पळ काढला. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, घटनास्थळावरून चार रिकामे काडतुस जप्त केले आहे. पोलीस रात्री उशिरापर्यंत लिटीलच्या गँगचा शोध घेत होते. (प्रतिनिधी)