शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अपारंपरिक ऊर्जा निर्मिती हे देशाचे मिशन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:41 IST

अपारंपरिक ऊर्जा निर्मिती हे देशाचे मिशन असून आगामी ५ वर्षात १० हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी केले.

ठळक मुद्देऊर्जामंत्री बावनकुळे : नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटमध्ये ७९० किलोवॅट सौर विद्युत प्रकल्पाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अपारंपरिक ऊर्जा निर्मिती हे देशाचे मिशन असून आगामी ५ वर्षात १० हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी केले.नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट जामठा येथे अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या ७९० किलोवॅट प्रकल्पाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेष जोगळेकर, आर्किटेक्ट अशोक मोखा, डॉ. आनंद पाठक, आनंद औरंगाबादकर, कर्नल शर्मा उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, रुफटॉप सोलरमध्ये ७९० किलोवॅटचा प्रकल्प नियोजित वेळेत उभे करणारे हे हॉस्पिटल पहिले आहे. हे हॉस्पिटल मुख्यमंत्र्यांचे मिशन आहे आणि त्या माध्यमातून सौर ऊर्जेला गतिमान करण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रकल्पातून ३५०० युनिट वीज दररोज निर्मिती होणार आहे. ३ कोटी ३७ लाख ५७ हजार रुपयांच्या या प्रकल्पाला केंद्र्र शासनाने ९१ लाख ५० हजार रुपये अनुदान दिले आहे. सौर ऊर्जेसोबत या हॉस्पिटलची इमारतही ग्रीन बिल्डिंग व्हावी असे आपल्याला वाटत असून त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. या हॉस्पिटलशेजारीच एक ३३ केव्ही अत्याधुनिक उपकेंद्र्र उभारले जाणार आहे. ते देशातील पहिले अत्याधुनिक उपकेंद्र असेल. त्यासाठी ७ कोटी रुपये खर्च करणार आहोत. यामुळे येथील वीज कधीही खंडित होणार नाही, असेही ऊर्जामंत्री म्हणाले.प्रास्ताविक हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेष जोगळेकर यांनी केले तर कर्नल शर्मा यांनी आभार मानले.बॉक्स...सौर ऊर्जा ही काळाची गरज :गृहराज्यमंत्री रणजित पाटीलसौर ऊर्जा ही काळाची गरज असून आता घरोघरी सौर ऊर्जा निर्मिती सुरु झाली तर नवल वाटणार नाही अशी स्थिती येत असल्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील म्हणाले. सौर ऊर्जा निर्मितीमुळे पारंपरिक विजबिलासाठ़ी येणाऱ्या खर्चात बचत होईल व तो खर्च रुग्णांसाठी वापरला जाईल. आगामी काळात प्रत्येक घरावर सौर वीज निर्मितीचे पॅनेल दिसतील असे काम या क्षेत्रात आता सुरु झाले असल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :cancerकर्करोगhospitalहॉस्पिटल