शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

डोस नसल्याचे कारण करून १८ वर्षांवरील लसीकरण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:07 IST

नागपूर शहरात यक्त ११२३१ जणांचे लसीकरण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणामुळे काही महिन्यांपूवीं भीतीचे वातावरण ...

नागपूर शहरात यक्त ११२३१ जणांचे लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे काही महिन्यांपूवीं भीतीचे वातावरण असलेल्या नागपूर शहरात सोमवारी फक्त ११२३१ लोकांना डोस देण्यात आले. दुसरीकडे देशभरात १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण सुरू झाले आहे; परंतु नागपुरात लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून १८ वर्षावरील लसीकरण सुरू करण्यात आलेले नाही. राज्य सरकारच्या आदेशानंतर शनिवारी ३० ते ४४ वयोगटाचा नवीन ग्रुप तयार करून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावरून नागपूर शहरातील नागरिकांचा खेळखंडोबा सुरू आहे. दरम्यान, मंगळवारपासून १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण होणार असल्याची माहिती आहे.

मध्यप्रदेशातील इंदूर शहरात सोमवारी एकाच दिवशी २.१२ लाख डोस देण्यात आले; परंतु नागपुरात डोस उपलब्ध नसल्याचे सांगत फक्त ११ हजारांच्या आसपास डोस देण्यात आले. लसीकरणाशिवाय कोरोना संक्रमणावर मात करणे शक्य नाही. नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या आसपास आहे. परंतु यातील ५.६१ लाख लोकांनाच पहिला डोस देण्यात आला आहे. तर १लाख ८८ हजार ८९८ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. सोमवारी नागपुरात एकूण ११२३१ डोस पैकी ८३९६ डोस ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना देण्यात आले. दुसरीकडे नागपूर ग्रामीणमध्ये एकूण ९१९३ डोस देण्यात आले. यात ३० ते ४४ वयोगटातील ६७८३ नागरिकांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे १८ ते ४४ वयोगटाचा समूह केंद्र सरकारने तयार केला आहे; परंतु राज्य सरकारने ३० ते ४४ वयोगटाचा नवीन समूह तयार केला आहे. गेल्या तीन दिवसात या वयोगटातील २५०९१ लाभार्थीचे लसीकरण करण्यात आले. शहरातील १०५ केंद्रावर लसीकरण सुरू आहे. परंतु नागरिकांची संखया विचारात घेता केंद्रांची संखया वाढविण्याची गरज आहे. शहराची ३० लाख लोकसंखया विचारात घेता २० जूनपर्यंत १८.७० टक्के लोकांनाच डोस देण्यात आला. हा वेग फार कमी आहे. लसीचे डोस उपलब्ध करून केंद्रांची संख्या वाढवावी लागेल अन्यथा शहरात कोरोनाची तिसरी लाट आल्याशिवाय राहणार नाही. यातून सावरणे कठीण होईल.

.....

आज सुरू होणार १८ वर्षावरील लसीकरण: आयुक्त

राज्य सरकारच्या निर्देशानुसार ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. १८ वर्षावरील सर्वांना मंगळवार पासून लस दिली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली. मनपाकडे ४० ते ४५ हजार डोस उपलब्ध आहेत. उपलब्धतेनुसार लसीकरण सुरू आहे. सरकारकडून मिळणाऱ्या निर्देशानुसार लसीकरण होत आहे. शहरात १०५ केंद्रावर लसीकरण सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.