शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

शेतकऱ्यांनाे पेरणीचे ‘नाे टेन्शन’; कापूस, साेयाबीन पेरणी १६ जुलैपर्यंत करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2022 07:30 IST

Nagpur News पावसाने दडी मारली असली तरी चिंता करण्याचे कारण नाही. कारण, कपाशी, साेयाबीन आणि धान या प्रमुख पिकांची पेरणी २२ ते ३० आठवड्यांमध्ये म्हणजेच १६ जुलैपर्यंत करता येऊ शकते.

ठळक मुद्देराज्यात सर्वदूर पावसाची दडीराज्यात १४० पैकी केवळ १५.४३ लाख हेक्टरवर पेरणी आटाेपली

सुनील चरपे

नागपूर : मृग पूर्ण व अर्धे आर्द्रा नक्षत्र काेरडे गेले आहे. राज्यात सर्वदूर पेरणीयाेग्य पाऊस बरसला नाही. त्यामुळे राज्यात किमान १४० लाख हेक्टरपैकी १५.४३ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, विदर्भ, खान्देश व मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट उद्भवण्याची शक्यता बळावली आहे. पावसाने दडी मारली असली तरी चिंता करण्याचे कारण नाही. कारण, कपाशी, साेयाबीन आणि धान या प्रमुख पिकांची पेरणी २२ ते ३० आठवड्यांमध्ये म्हणजेच १६ जुलैपर्यंत करता येऊ शकते.

राज्यात १० जूनपर्यंत सरासरी ७० मिमी पावसाची नाेंद हाेणे अपेक्षित असताना यावर्षी १३.५ मिमी काेसळला. मागील वर्षी याच काळात ६८.४ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली हाेती. २० जूनपर्यंत सरासरी १३८.४ मिमी पाऊस काेसळताे. यावर्षी ६०.१ मिमी पाऊस झाला असून, मागील वर्षी २१६ मिमी पाऊस काेसळला हाेता. ३० जूनपर्यंत सरासरी २८२.१ मिमी पाऊस काेसळताे. मागील वर्षी ३० जूनपर्यंत २८२.१ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली हाेती. यावर्षी २८ जूनपर्यंत राज्यात सरासरी १९३.८ मिमी पावसाची नाेंद हाेणे अपेक्षित असताना १३४.६ मिमी पाऊस काेसळला. मागील वर्षी याच काळात १३९.७ मिमी पावसाची नाेंद झाली आहे.

विशेष म्हणजे हा पाऊस पेरणीयाेग्य नाही, अशी माहिती कृषी विभागाने दिली. राज्यात २७ जूनपर्यंत १२.२ टक्के पेरणी आटाेपली असून, यात धूळ पेरणीचा समावेश आहे. पावसाने दडी मारल्याने या शेतकऱ्यांच्या डाेक्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. राज्यात ८७.८ टक्के पेरणी अद्याप व्हायची आहे.

पेरणीयाेग्य काळ व उत्पादनावरील परिणाम

कृषी विभागाच्या पीक कॅलेंडरनुसार(२ जानेवारीपासून) राज्यात कपाशी व साेयाबीनच्या पेरणीचा याेग्य काळ हा सरासरी २३ ते २८ व्या आठवड्यादरम्यान म्हणजेच १२ जून ते १६ जुलै, तर धानाचा पेरणीयोग्य काळ हा २७ ते ३० आठवड्यांचा म्हणजेच ३ ते ३० जुलै दरम्यानचा आहे. या काळात कपाशी, साेयाबीन व धानाच्या पिकांची पेरणी केल्यास पिकांच्या उत्पादनावर फारसा परिणाम हाेत नाही. त्यानंतर पेरणी केल्यास पिकांचे उत्पादन घटण्याची दाट शक्यता असते.

पिकांना पावसाची गरज

कपाशीला जून व जुलैमध्ये सरासरी ८२.४ ते १२६ मिमी, ऑगस्टमध्ये १०१.३ ते १६१.० मिमी, सप्टेंबर-ऑक्टाेबरमध्ये २२५.४४ ते ३२५.७ मिमी पावसाची गरज असते. साेयाबीनच्या पिकाला जून-जुलैमध्ये सरासरी ४६.९ मिमी, सप्टेंबरमध्ये १३७.७ मिमी, ऑक्टाेबरमध्ये ७७.४ मिमी आणि त्यानंतरच्या काळात ४५.७ मिमी पावसाची आवश्यकता असते. धानाच्या पिकाला जुलैमध्ये सरासरी १४७.३ ते १८८.२ मिमी, तर ऑगस्टमध्ये ११९.३ मिमी ते २५५.५ मिमी पावसाची आवश्यकता असते.

उशिरा पेरणीचा साेयाबीनला धाेका

१६ जुलैनंतर पेरणी झाल्यास साेयाबीनच्या पिकाला कापणीच्यावेळी परतीच्या पावसाचा धाेका उद्भवू शकताे. त्यामुळे शेतकऱ्यांनी १६ जुलैनंतर साेयाबीनची पेरणी करणे टाळावे. त्याला पर्याय म्हणून मका किंवा कपाशीची निवड करावी. विदर्भात धानाचे पीकही परतीच्या पावसामुळे खराब हाेऊ शकते. सप्टेंबरच्या शेवटच्या व ऑक्टाेबरच्या पहिल्या आठवड्यात सतत ढगाळ वातावरण असल्यास काही प्रमाणात कपाशीच्या पात्या व बाेंडगळ हाेऊ शकते, अशी माहिती यवतमाळ येथील शेतकरी मिलिंद दामले यांच्यासह कृषी विभागाने दिली.

...

टॅग्स :agricultureशेती