शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

तेरे बिना जिंदगी से कोई ‘शिकवा’ नही..!

By admin | Updated: February 5, 2015 01:06 IST

हिंदी चित्रपटसृष्टीतले सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणजे राहुल देव बर्मन. प्रत्येक गीतप्रकार सारख्याच ताकदीने सांभाळणारे आणि वाद्यसंगीताची अप्रतिम मेलोडी साधणारे आर. डी. काळ बदलला,

आर.डी. बर्मन यांच्या गीतांची : स्थानिक कलावंतांचे सादरीकरण नागपूर : हिंदी चित्रपटसृष्टीतले सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणजे राहुल देव बर्मन. प्रत्येक गीतप्रकार सारख्याच ताकदीने सांभाळणारे आणि वाद्यसंगीताची अप्रतिम मेलोडी साधणारे आर. डी. काळ बदलला, पिढ्या बदलल्या पण कालबाह्य होऊ शकले नाही. त्यांनी संगीतबद्ध केलेले गीत ऐकणे म्हणजे आपल्याच जीवनातील एखाद्या अनुभवाशी समरस होता येण्याचा आनंद आहे. त्यामुळे आर. डी.ची गीते ऐकताना पुन:प्रत्ययाचा आनंद ठरलेलाच असतो. त्यात गीताचा आशय आणि भाव ओतणारा कसबी गायक आणि नेमकेपणाने वाद्यसंगीताचा परिणाम साधणारे वादक असले तर हा आनंद अधिक वाढतो. सायंटिफिक सभागृहात सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमात आर. डी. बर्मन यांच्या गीतांनी एक सुरेल मैफिल सजली. माधवी पांडे यांच्या संकल्पनेतून या ‘शिकवा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गीतांचे संदर्भ सांगत आणि आर. डीं. च्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवणारे त्यांचे निवेदन आणि रसिली गीते यामुळे हा कार्यक्रम रंगतदार झाला. विशेषत: आर. डीं.ची अनेक अनवट गीते या कार्यक्रमात एकत्रित ऐकण्याचा जरा दुर्मिळ योग कार्यक्रमात आल्याने रसिकांनीही गीतांच्या निवडीबाबत समाधान व्यक्त केले. नागपूरचा किशोरकुमार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सागर मधुमटकेने यावेळी रसिकांना जिंकले. आर. डी. चे आवडते गायक म्हणजे किशोरकुमार आणि आशा भोसले. त्यात खास किशोरकुमारच्याच अंदाजात सागरने तबीयतीने सादरीकरण करुन रसिकांची दाद घेतली. जवळपास प्रत्येक गीताला वन्समोअर देत हा कार्यक्रम रसिकांनी ‘एन्जॉय’ केला. त्यात शहरातील गुणी गायिका मंजिरी वैद्य, श्रुती चौधरी आणि सारंग जोशी यांनी समरसून गीत सादर क रताना रसिकांना आनंद दिला. कार्यक्रमाचा प्रारंभ ‘तेरे बिना जिंदगी से कोई...’ या गीताने करण्यात आला. त्यानंतर अनेक लोकप्रिय आणि भावनांच्या तळाशी जाणारी गीते प्रामुख्याने या कार्यक्रमात सादर करण्यात आली. यात ‘तुमसे नाराज नही जिंदगी..., मेरा कुछ सामान तुम्हारे पास.., बिती ना बिताई रैना..., क्या जानु सजन.., तुम बिन जाऊ कहाँ..., अब के ना सावन बरसे..., निसुल्ताना रे.., घर आजा घिर आयी..., नाम गुम जाएगा.., इस मोड से जाते है..., प्यार करनेवाले प्यार करते है..., गुलाबी आँखे जो तेरी देखी..., करवटे बदलते रहे..., दम मारो दम..’ आदी प्रत्येक गीताने रंगत आणली. कार्यक्रमातल्या प्रत्येकच गीताचे सादरीकरण सर्वच गायकांनी तयारीने केल्याने कार्यक्रमाने उंची गाठली. कितीवेळा आणि कोठे वन्समोअर द्यावा, याचा पेच आयोजकांना आणि रसिकांनाही पडला. याप्रसंगी प्रेम, विरह, व्याकुळता, उत्कटता आणि मस्तीभऱ्या गीतांनीही कार्यक्रमाची रंगत वाढविली. ‘गुलमोहर गर तुम्हारा नाम होगा..., पन्ना की तमन्ना है..., आजा आजा..., कहना है... तुम आ गये हो..., धन्नो की आँखो मे...चांद मेरा दिल...’ आदी गीतांचे सादरीकरण करण्यात आले. (प्रतिनिधी)